बॉयफ्रेंडच्या निधनानंतर संजूबाबाची मुलगी सोशल मीडियावर सक्रीय

त्रिशाला कायम सोशल मीडियावर सक्रीय असते.

Aug 05, 2019, 16:12 PM IST

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर यांच्या बॉलिवूड पदार्पणानंतर आणखी स्टार किड्स आपला डेब्यू करण्याच्या मार्गावर आहेत. अभिनेता संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशाला दत्त देखील अभिनय क्षेत्रात नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाली आहे. त्रिशाला कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे अनेक फोटो फार कमी वेळात सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बॉयफ्रेंडच्या निधनानंतर ती पुन्हा सोशल मीडियावर पूर्वी प्रमाणे सक्रीय झाली आहे. त्रिशाला सध्या आपले संपूर्ण लक्ष फॅशन डिझाइनींगकडे देत आहे. आपल्या मुलीने अभिनय क्षेत्रात काम करावे अशी संजय दत्तची इच्छा आहे. 

 

1/5

बॉलिवूड बद्दल काय म्हणतो संजय दत्त

बॉलिवूड बद्दल काय म्हणतो संजय दत्त

बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी इंडस्ट्रीची भाषा अवगत असणे फार गरजेचे आहे. ही ग्लॅमरची दुनिया आहे. येथे काम करणं फार अवघड आहे. मी तिच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसे आणि ऊर्जा खर्च केली आहे. 

2/5

आताही बॉयफ्रेंडच्या अठवणीत असते त्रिशाला

आताही बॉयफ्रेंडच्या अठवणीत असते त्रिशाला

बॉयफ्रेंडच्या निधनानंतर ती स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. ती आता सुद्धा तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीच्या अठवणीत असते. तिने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट देखील कोली होती.  

3/5

संजयच्या पहिल्या पत्नीची मुलगी

संजयच्या पहिल्या पत्नीची मुलगी

त्रिशाला संजयची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे.  

4/5

न्यूयॉर्कमध्ये राहते त्रिशाला

न्यूयॉर्कमध्ये राहते त्रिशाला

त्रिशाला तिच्या आजी-आजोबांसोबत न्यूयॉर्कमध्ये राहते.   

5/5

मैत्रीणीच्या बहिणीच्या लग्नात उपस्थित होती त्रिशाला

मैत्रीणीच्या बहिणीच्या लग्नात उपस्थित होती त्रिशाला

मैत्रीणीच्या बहिणीच्या लग्नासाठी त्रिशाला गेली होती. त्यावेळी सजणं, समारंभासलाठी तयार होणं, या गोष्टी तिच्यासाठी अत्यंत कठिण होत्या.