'...तर तुला गावी पाठवेन', बोल्ड अभिनेत्रीला वयाच्या 19 वर्षी लग्न करणाऱ्या आईची धमकी; Boyfriend मुळे अचडणीत

Bhojpuri Actress Warning To Daughter Over Boyfriend: वयाच्या 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीची मुलगी 23 वर्षांची असून या माय-लेकीची जोडी अभिनयापेक्षा खासगी आयुष्य आणि सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळेच चर्चेत असतात. सध्या या अभिनेत्रीच्या मुलीने तिला आईकडून मिळालेल्या एका धमकी बद्दलचं विधान अचानक चर्चेत आलं आहे. नेमकं काय घडलं होतं आणि का अशी धमकी या अभिनेत्रीने आपल्याच मुलीला दिलेली पाहूयात...

| Feb 26, 2024, 15:06 PM IST
1/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

हिंदीतील छोटा पडदा म्हणजेच टीव्ही मालिका आणि भोजपूरी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेलं नाव म्हणजे श्वेता तिवारी. श्वेता ही इन्स्टाग्रामवरील तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

2/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

श्वेताची मुलगी पलक तिवारी की स्टार किड असल्यापासून प्रसाराध्यमांमुळे लोकप्रिय झाली.

3/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

आईकडून पलकला अभिनयाचा वारसा मिळाला आहे. पलक आईच्या पावलांवर पाऊल टाकून अभिनयाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याच्या वाटेवर चालू लागली आहे. मात्र आईप्रमाणे छोट्या पडद्यापासून सुरुवात करण्याऐवजी पलकने थेट चित्रपटांमधून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.  

4/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रा श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने मागील वर्षी सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये पलकबरोबर इतरही अनेक कलाकारांनी पहिल्यांच सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं.   

5/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

अनेक कलाकार असूनही पलकने 'किसी का भाई किसी की जान'मध्ये आपल्या कामाची छाप सोडली. खरं तर पलक तिवारी ही तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. मागील वर्षी समोर आलेल्या वृत्तानुसार पलक तिवारी अभिनेता सैफ अली खानच्या मुलाला म्हणजेच इब्राहिम अली खानला डेट करतेय.  

6/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

पलक तिवारीने मागील वर्षी सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये पलकने तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते.

7/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या प्रमोशनदम्यान पलक तिवारीने आई श्वेता तिवारीबरोबर तिचं नातं कसं आहे याबद्दल भाष्य केलं होतं.  

8/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पलकने दिलेल्या माहितीनुसार, तारुण्यात म्हणजेच टीनएजमध्ये जेव्हा मला कोणत्याही मुलाबरोबर डेटला जायचं असायचं तेव्हा ती आईला खोटं सांगून जायची. 

9/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

आईशी खोटं बोलून डेटला जाण्याचा पलकचा प्लॅन दरवेळेस फ्लॉप ठरायचा. यामागील कारण म्हणजे श्वेता तिवारीला पलक खोटं बोलत असल्याचं लगेच समजून यायचं. ही माहिती पलकनेच दिली आहे.

10/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

तू दर वेळेस खोटं बोलण्याचं कष्ट का घेतेस? दर वेळेस अवघ्या 2 तासांमध्ये तू खोटं बोलत असल्याचं सिद्ध होतं तरी हा खटाटोप का करतेस? असं आई म्हणायची अशी आठवण पलकने सांगितली.

11/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

"माझा एक बॉयफ्रेण्ड होता. मी 15 किंवा 16 वर्षांची होते. शालेय वयात बॉलफ्रेण्ड असतो त्या वयात एखाद्या मॉलमध्ये वगैरे फिरायला जाण्यास अशी जोडपी प्राधान्य देतात. असाच माझा एक प्रयत्न होता," असंही पलकने या मुलाखतीत एक किस्सा कथन करताना सांगितलं. पलक तिवारीची व्हायरल ओळख सांगायची झाली तर ती गुरु रंधावाच्या 'बिजली बिजली' गाण्यामुळेही प्रचंड लोकप्रिय झाली होती.   

12/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

पलक पुढे म्हणाली की, "मला माझ्या बॉयफ्रेण्डबरोबर मॉलमध्ये जायचं होतं म्हणून मी आईला खोटं सांगून घरातून निघाले. मी खाली लपाछपी खेळायला जात आहे असं आईला सांगितलं. आईने मला परवानगी दिली. खरं तर आई त्यावेळेस घरी नव्हती. ती दुसऱ्या शहरात होती. तरीही तिला समजलं की मी खाली खेळायला गेले नव्हते तर मॉलमध्ये गेले होते."

13/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

मी खाली खेळायला जातेय सांगून एका मुलाबरोबर मॉलमध्ये फिरायला गेल्याचं समजल्यानंतर आईचा पार चढला, असंही पलकने सांगितलं. या प्रकरणामुळे श्वेता एवढी संतापली की तिने पलकला थेट धमकी दिली.

14/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

"असं वागणार असशील तर मी तुझे केस कापून टाकेन. मी तुला गावाला पाठवून देईल," अशी धमकी आईने दिल्याचं पलकने 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.   

15/15

Bhojpuri Actress Shweta Tiwari Warning To Daughter Palak

श्वेता तिवारीने वयाच्या 19 व्या वर्षी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्न केलं होतं. त्यानंतर तिला याचा मोठा पश्चाताप झाला होता. त्यामुळेच आपल्या मुलीने आपण केलेली चूक करु नये अशी श्वेताची इच्छा असल्याचंही पलक म्हणाली. पलक 23 वर्षांची असून श्वेता 43 वर्षांची आहे.