'त्याला माझ्याबरोबर एक रात्र झोपायचं होतं', अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव; म्हणाली, 'हॅण्डशेक करताच..'

Bigg Boss 17 Famed Actress Casting Couch Experience: 'बिग बॉस 17' मुळे चर्चेत आलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्याबरोबर 2 वेळा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याचं म्हटलं आहे. आपल्या कौशल्याच्या जोरावर चित्रपट सृष्टीमध्ये काम करण्याची इच्छा या अभिनेत्रीला होती. मात्र तिची ही स्वप्न भंग पावली जेव्हा तिला एका चित्रपट निर्मात्याच्या वाईट इच्छांबद्दल समजलं. तिने त्यानंतर या निर्मात्याची चारचौघांमध्ये इज्जत काढली. नेमकं घडलं काय होतं पाहूयात...

| Nov 25, 2023, 13:02 PM IST
1/13

bigg boss 17 actress ankita lokhande casting couch experience

खरं तर या अभिनेत्रीला कामासंदर्भात अनेक ऑफर्स आल्या होत्या. तिला फराह खानने कामाची ऑफर दिली होती. शाहरुख खानने तिला सर्वोत्तम डेब्यू होईल तुझा असा शब्दही दिला होता. मात्र ती तिच्या जोडीदाराच्या भल्याचा विचार करत अडकून राहिली.

2/13

bigg boss 17 actress ankita lokhande casting couch experience

करिअरच्या सुरुवातीला या अभिनेत्रीकडे समोरुन अनेक संधी साचून आल्या. मात्र कास्टिंग काउचवर आलेल्या घाणेरड्या अनुभवांमुळे ती घाबरली आणि या क्षेत्रात पुढे जावं की नाही याबद्दल तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ही अभिनेत्री 'बिग बॉस 17'मध्ये तिच्याबरोबर घडलेल्या या धक्कादायक गोष्टींचा खुलासा करत आहे.

3/13

bigg boss 17 actress ankita lokhande casting couch experience

'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिला पहिल्यांदा आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे.

4/13

bigg boss 17 actress ankita lokhande casting couch experience

अंकिताने तिला एकदा नाही तर दोन वेळा कास्टिंग काऊचचा घाणेरडा अनुभव आला असं म्हटलं आहे.

5/13

bigg boss 17 actress ankita lokhande casting couch experience

पहिल्यांदा 19-20 वर्षांची असताना अंकिताला अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले. तर दुसऱ्यांदा टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून लोकप्रिय झाल्यानंतरही असाच अनुभव आला.

6/13

bigg boss 17 actress ankita lokhande casting couch experience

अंकिताने एका मुलाखतीमध्ये खुलासा करताना, जेव्हा करिअरला सुरुवात केली तेव्हा तिच्याकडे एका दाक्षिणात्य चित्रपटाची ऑफर आली. तिला या भूमिकेसाठी तडजोड करण्यास सांगण्यात आलं. 

7/13

bigg boss 17 actress ankita lokhande casting couch experience

अंकिताने तडजोड करण्याऐवजी चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. "मी रुममध्ये एकटी होती. त्यावेळेस मी 19-20 वर्षांची होती. मी त्या व्यक्तीला विचारलं की तुमच्या निर्मात्याला कशी तडजोड हवी आहे? मला कोणाबरोबर पार्टीला किंवा डिनरला जावं लागेल का?" असा प्रश्न विचारल्याचं अंकिताने सांगितलं.

8/13

bigg boss 17 actress ankita lokhande casting couch experience

मात्र ज्यावेळेस त्या निर्मात्याला आपल्याबरोबर एक रात्र घालवायची आहे हे समजलं तेव्हा अंकिता चांगलीच संतापली. तिने या घाणेरड्या मागणीवरुन निर्मत्याला चांगलेच झापले.

9/13

bigg boss 17 actress ankita lokhande casting couch experience

"त्यांनी जशी मला निर्मात्याची इच्छा सांगितली मी त्यांचा बॅण्ड वाजवला. मला वाटतं तुमच्या निर्मात्याला फक्त मुलीबरोबर झोपायचं आहे. त्याला चांगल्या अभिनेत्रीबरोबर काम करण्याची इच्छा दिसत नाही, असं मी त्याला म्हणाले आणि तिथून निघून गेले," असं अंकिताने या प्रसंग सांगताना म्हटलं.

10/13

bigg boss 17 actress ankita lokhande casting couch experience

अंकिता लोखंडेची या व्यक्तीने माफी मागितली आणि त्यानंतर तिला मी नक्की तुला माझ्या चित्रपटामध्ये भूमिका देण्याचा प्रयत्न करेन असं सांगितलं. मात्र अंकिताने त्या व्यक्तीला, "आता तू मला चित्रपट दिला तरी मी त्या चित्रपटामध्ये काम करणार नाही," असं सांगितलं.

11/13

bigg boss 17 actress ankita lokhande casting couch experience

38 वर्षीय अंकिताला पुन्हा एकदा कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. "जेव्हा मी पुन्हा चित्रपटांमध्ये काम करु लागले तेव्हा मला पुन्हा असा अनुभव आला. मी फक्त त्याच्याशी हस्तांदोलन केलं होतं," असं अंकिता म्हणाली.

12/13

bigg boss 17 actress ankita lokhande casting couch experience

"मी नाव घेऊ इच्छित नाही कारण तो फार मोठा अभिनेता होता. मला त्याचा स्पर्श चुकीचा वाटला अन् मी पटकन हात मागे खेचला. माझं इथे काहीच होणार नाही हे मी ओळखलं कारण तिथेही तडजोड करावी लागणार होती," असं हा अनुभव सांगताना अंकिता म्हणाली.

13/13

bigg boss 17 actress ankita lokhande casting couch experience

"मला तडजोड करावी लागेल याचा अंदाज आला आणि मी तिथून निघाले कारण या साऱ्या गोष्टी माझ्या तत्वात बसणाऱ्या नाहीत," असं अंकिता म्हणाली.