कोट्यावधींची जमीन, 5 शस्त्रांचा परवाना अन्... वादात अडकलेल्या बृजभूषण सिंह यांची संपत्ती पाहून बसेल धक्का

Jan 20, 2023, 17:58 PM IST
1/5

Brij Bhushan Sharan Singh bjp

सध्या या सर्व वादाच्या भोवऱ्यात सापडलेले खासदार बृजभूषण सिंह यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे. महागड्या गाड्यांसह, शस्त्रे, शेतजमीन, स्थावर आणि जंगम अशी मालमत्ता देखील बृजभूषण सिंह यांच्याकडे आहे.

2/5

wrestling body chief Brij Bhushan Sharan Singh

2019च्या लोकसभा निवडणुकीआधी बृजभूषण सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण 9.89 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. तसेच बृजभूषण यांच्याकडे टोयोटा इनोव्हा आणि महिंद्रा स्कॉर्पिओ या एसयूव्ही गाड्यादेखील आहेत.

3/5

WFI President Brijbhushan Sharan Singh

दुसरीकडे बृजभूषण सिंह यांच्या पत्नीकडे 6.35 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर फॉर्च्युनर कार आहे. प्रतिज्ञापत्रानुसार बृजभूषण सिंह यांच्याकडे पाच तोळे आणि पत्नीकडे 20 तोळे सोने आहे.  (फोटो सौजन्य - Facebook)

4/5

brijbhushan sharan singh allegations

सिंह पती-पत्नीकडे एकूण पाच शस्त्रे असल्याची माहितीही समोर आली आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्या नावावर एक पिस्तूल, एक रायफल, एक रॅपिटर अशी एकूण तीन शस्त्रे आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे रायफल आणि रॅपिटरचा परवाना आहे. 

5/5

brijbhushan sharan singh

तसेच बृजभूषण सिंह यांच्याकडे एक कोटींची शेतजमीन आणि दोन कोटींची जमीनदेखील आहे. (फोटो सौजन्य - Facebook)