या दिग्दर्शकामुळे सलमानची हिरोईन झाली स्टार

Apr 05, 2018, 14:53 PM IST
1/5

Blackbuck poaching case Sonali Bendre is discovery of Mahesh Bhatt

Blackbuck poaching case Sonali Bendre is discovery of Mahesh Bhatt

काळवीट शिकार प्रकरणी सलमानला दोषी ठरवण्यात आलेय. तर बाकी आरोपी सैफ अली खान, तब्बू,नीलम,सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत कुमार यांची निर्दोष मुक्तता केलीये. अनेक महिन्यांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब असलेली सोनाली या प्रकऱणामुळे पुन्हा चर्चेत आली. मात्र सोनाली बेंद्रेची कोर्टाने निर्दोष सुटका केली.   

2/5

Blackbuck poaching case Sonali Bendre is discovery of Mahesh Bhatt

Blackbuck poaching case Sonali Bendre is discovery of Mahesh Bhatt

सामान्य कुटुंबात जन्मलेली सोनाली बेंद्रेला महेश भट्ट एक शोध मानतात. सोनालीचे वडील सरकारी नोकरी करत होते. त्यामुळे बदली होत असल्याने त्यांना सतत शहरे बदलावी लागत. सोनालीचा जन्म मुंबईत झाला असला तरी तिचे शिक्षण विविध शहरांमध्ये झालाय.   

3/5

Blackbuck poaching case Sonali Bendre is discovery of Mahesh Bhatt

Blackbuck poaching case Sonali Bendre is discovery of Mahesh Bhatt

कॉलेज कार्यक्रमात सोनी बेंद्रे रँपवॉक करत असे. त्याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महेश भट्ट यांची नजर तिच्यावर पडली आणि तिला सिनेमांमध्ये काम करण्याचा सल्ला त्यांनी तिला दिला. १९९४मध्ये सोनालीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी तिचे आग आणि नाराज हे सिनेमे रिलीज झाले. मात्र दोन्ही सिनेमांना तितकेसे यश आले नाही. मात्र तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.   

4/5

Blackbuck poaching case Sonali Bendre is discovery of Mahesh Bhatt

Blackbuck poaching case Sonali Bendre is discovery of Mahesh Bhatt

सोनाली बेंद्रेच्या हिट सिनेमांच्या लिस्टमध्ये सरफरोश, सपूत, जख्म, रक्षर, हम साथ साथ है, कल हो ना हो आणि हमारा दिल आपके पास है...त्यानंतर सिनेमांमध्ये यश न मिळाल्याने सोनालीने १२ नोव्हेंबर २००२मध्ये सिने दिग्दर्शक गोल्डी बहल यांच्यासोबत विवाह केला.   

5/5

Blackbuck poaching case Sonali Bendre is discovery of Mahesh Bhatt

Blackbuck poaching case Sonali Bendre is discovery of Mahesh Bhatt

सोनालीने छोट्या पडद्यावरही आपले नशीब आजमावले आहे. तिने क्या मस्ती क्या धूम या शोचे निवेदन केले होते. इंडियन आयडॉलमध्येही तीने परीक्षक म्हणून काम केले होते. श्री और श्रीमती, इंडियन आयडॉल आणि इंडियाज गॉट टॅलेंटमध्येही तीने परीक्षक म्हणून काम केले होते.