Mowgli: Legend of the Jungle 'या' अभिनेत्याच्या आवाजात 'शेरखान' पुन्हा डरकाळी फोडणार

Nov 20, 2018, 13:59 PM IST
1/6

Mowgli: Legend of the Jungle 'या' अभिनेत्याच्या आवाजात 'शेरखान' पुन्हा डरकाळी फोडणार

'जंगल बुक' किंवा मोगली असं म्हटलं तरीही अनेकांच्याच डोळ्यांत एक वेगळी अशी चमक येते. अर्थात त्यात ओसंडून वाहणारा उत्साह आणि भरपूर कुतूहल असं वातावरण पाहायला मिळतं. असा हा मोगली एका नव्या रुपात पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सवर 'मोगली - लेजेंड ऑफ जंगल' ही सीरिज लवकरच सुरु होणार असून, त्या निमित्ताने लाडक्या बॉलिवूड कलाकारांची वेगळी कला या माध्यमातून पाहायाला मिळणार आहे.  मोगली म्हटलं की जंगलात वावरणाऱ्या त्या मुलासोबतच डोळ्यांसमोर येतात ते म्हणजे 'शेरखान', 'बघिरा', 'भालू', 'का' आणि इतर प्राणी पात्र. 

2/6

Mowgli: Legend of the Jungle 'या' अभिनेत्याच्या आवाजात 'शेरखान' पुन्हा डरकाळी फोडणार

अशाच या पात्रांसाठी बी टाऊन कलाकार त्यांचा आवाज देणार आहेत. सोशल मीडियावर या कलाकार मंडळींनीच याविषयीची घोषणा केली आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन हा 'बघिरा'साठी आपला भारदस्त आवाज देणार आहे. 

3/6

Mowgli: Legend of the Jungle 'या' अभिनेत्याच्या आवाजात 'शेरखान' पुन्हा डरकाळी फोडणार

मोगली म्हटलं की डोळ्यांसमोर येणारं आणखी एक पात्र म्हणजे 'रक्षा', अर्थात त्याची आई. नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये रक्षा ऐवजी 'निशा' हे नाव वापरण्यात आलं असून, मोगलीच्या या अनोख्या आईसाठी आवाज देणार आहे अभिनेत्री माधुरी दीक्षित. 

4/6

Mowgli: Legend of the Jungle 'या' अभिनेत्याच्या आवाजात 'शेरखान' पुन्हा डरकाळी फोडणार

सतत मधाच्या शोधात असणाऱ्या, आराम करणाऱ्या पण तरीही मोगलीची काळजी करणाऱ्या 'भालू'साठी अभिवेते अनिल कपूर यांच्या आवाजाचा वापर करण्यात येणार आहे. 

5/6

Mowgli: Legend of the Jungle 'या' अभिनेत्याच्या आवाजात 'शेरखान' पुन्हा डरकाळी फोडणार

'का', म्हणून प्रेक्षकांसमोर येत त्यांना दचकवणाऱ्या या अजगराला अभिनेत्री करिना कपूर खान ही आपला आवाज देणार आहे. 

6/6

Mowgli: Legend of the Jungle 'या' अभिनेत्याच्या आवाजात 'शेरखान' पुन्हा डरकाळी फोडणार

'मोगली...' या सीरिजमधील आणखी एक महत्त्वाचं आणि तितकच लोकप्रिय पात्र म्हणजे 'शेरखान'. संपूर्ण जंगलामध्ये दहशतीचं वातावरण करणाऱ्या आणि मोगलीचा रागराग करणाऱ्या 'शेरखान'साठी अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा आवाज वापरण्यात येणार आहे. त्यामुळे 'शेरखान'ची ही नवी दरकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेटफ्लिकचा हा नवा आणि तितकाच हवाहवासा वाटणारा नजराणा ७ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.