अखेर अरबाजनने सांगितलं घटस्फोटामागचं कारण

Oct 31, 2018, 14:04 PM IST
1/6

अखेर अरबाजनने सांगितलं घटस्फोटामागचं कारण

नाती ही मृगजळासारखी असतात हे म्हणणं अगदी खरंच आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आयुष्यात येणारी वळणं पाहता त्याचा अनेकदाच प्रत्यय आला आहे. अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा खान यांनी जवळपास २० वर्षांनंतर वैवाहिक आयुष्यातून विभक्त होण्याचा निर्णय घेत वेगळ्या वाटा निवडल्या. या निर्णयानंतर ते दोघंही आपल्य़ा आयुष्यात रमले. पण, आतापर्यंत अरबाजने कधीच खुलेपणाने त्याच्या आणि मलायकाच्या नात्यात दुरावा का आला, यामागचं खरं कारम स्पष्ट केलं नव्हतं. आता मात्र त्याने एका कार्यक्रमात आपल्या नात्याविषयी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. 

2/6

अखेर अरबाजनने सांगितलं घटस्फोटामागचं कारण

'जवळपास १९ वर्षे हे नातं सांभाळण्याचा आपण प्रयत्न केला. पण, आपण यात अपयशी ठरल्याची खंत त्याने व्यक्त केली. अनेकदा नात्यांच्या बाबतीत मग ते एखादं रिलेशनशिप असो किंवा वैवाहिक नातं कोणत्याही स्तरावर जाऊन बरेचजण नातं टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मुळात इथे नात्यात असणारा विश्वास अतिशय महत्त्वाचा आहे. पण, असं प्रत्येकवेळी शक्य होतंच असं नाही. अनेकांना काही बाबतीत बऱ्याच अपेक्षा असतात', असं तो म्हणाला.   

3/6

अखेर अरबाजनने सांगितलं घटस्फोटामागचं कारण

'जीवनात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात. एक म्हणजे आपल्यापाशी जे आहे त्यातच आनंद मानणारे आणि दुसरे म्हणजे आपल्यापाशी सर्वकाही असूनही आणखी हव्यास करणारे. अशा जोड्या मग आपणच सर्वाधिक आनंदी जोडी असल्याचं इतरांना दाखवून देतात', असंही वक्तव्य त्याने केलं. नात्यात असणारे वाद आणि त्यामुळे आलेला दुरावा, झालेला मनस्ताप त्याच्या या वक्तव्यातून व्यक्त होत असल्याचं लगेचच कळत आहे.    

4/6

अखेर अरबाजनने सांगितलं घटस्फोटामागचं कारण

अरबाज आणि मलायकाच्या नात्यात दुरावा आल्यानंतर काही दिवसांनीच या दोघांच्या आयुष्यात प्रेम परतल्याचं पाहायला मिळालं.   

5/6

अखेर अरबाजनने सांगितलं घटस्फोटामागचं कारण

गेल्या काही दिवसांपासून अरबाज जॉर्जिया आंद्रीयानी हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असून, येत्या काळात ते लग्नाचा विचार करण्याची चिन्हं आहेत.   

6/6

अखेर अरबाजनने सांगितलं घटस्फोटामागचं कारण

मलायकाही अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे प्रकाशझोतात आली आहे. काही दिवसांपूर्वीच बी- टाऊनमध्ये त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला होता.