Sidharth Kiara Wedding: कियारा अडवाणीच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो आले समोर? पाहा Photo

Sidharth Kiara Wedding: बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा  (Sidharth Malhotra) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नाचा अवघे दिवस उरले आहेत.

Feb 03, 2023, 21:41 PM IST

Sidharth Kiara Wedding: बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा  (Sidharth Malhotra) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नाचा अवघे दिवस उरले आहेत. या लग्नापुर्वी कियारा अडवाणीच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो समोर आले आहेत. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

1/5

kiara advani

कियारा अडवाणी लवकरच सिद्धार्थ मल्होत्राची वधू होणार आहे. आता तिचा एक फोटो व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये ती नववधूसारखी वेशभूषा करून हातावर मेंदी लावताना दिसत आहे.  

2/5

kiara advani

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, कियारा अडवाणी ब्राइडल गेटअपमध्ये दिसत आहे. सेलिब्रिटी मेहंदी कलाकार वीणा नागडा तिच्या हातावर मेहंदी लावत आहे.सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे.

3/5

kiara advani

खरं तर हा फोटो जूना आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका जाहिरातीच्या शूटसाठी वीणा नागदाने कियाराच्या हातावर मेंदी लावली होती. तो फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे.  

4/5

kiara advani

वीणा नागदा एक प्रसिद्ध मेहेंदी कलाकार आहे. कियारापूर्वी तिने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हातावर मेंदी लावली आहे.

5/5

kiara advani

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या  'सूर्यगड पॅलेस'मध्ये (Suryagarh Palace) विवाह बंधनात अडकणार आहेत. 'सूर्यगड पॅलेस'मध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.