पाहा चंद्रावर इथं होती सुशांतची जमीन...

Jun 15, 2020, 18:51 PM IST
1/8

अभिनेता सुशांत सिंह राजपूत sushant singh rajput यानं वयाच्या ३४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. आत्महत्येचं अगदी टोकाचं पाऊल उचलत त्यानं आपलं आयुष्य संपवून टाकलं. सुशांतची ही अनपेक्षित एक्झिट म्हणजे एक न पचणारा धक्काच. शांत स्वभावाचा आणि अभिनय कौशल्याच्या बळावर पुढे आलेला सुशांत या झगमगाटाच्या दुनियेत फार रमला नाही किंवा मग आपल्याला वेगळं पाडल्याच्या भावनेनं त्याच्या मनात असं काही घर केलं की त्याला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं हे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत. 

2/8

सुशांतचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती व्यापक होता, हे त्याच्या सोशल मीडिया पोस्ट आणि त्यानं घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय पाहता लक्षात येतो. मी ही आत्महत्या का, हा मुद्दासुद्धा विचार करायला भाग पाडतो. 

3/8

असं म्हटलं जातं की, जवळपास दोन वर्षांपूर्वी सुशांतनं चंद्रावर Mare Muscoviense किंवा "Sea of Muscovy" या नावानं ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रात चक्क जमीन अर्थात भूखंड खरेदी केला होता. सोशल मीडियावर त्यानं याचा एक फोटोही पोस्ट केला होता. 

4/8

सुशांतच्या इन्स्टाग्रामवर जाऊन त्याचे काही फोटो पाहिले असता पृथ्वी आणि अंतराळाप्रती असणारं त्याचं प्रेम अगदी स्पष्टपणे दिसत आहे.   

5/8

आगामी चित्रपटाच्या निमित्तानं असो किंवा मग आणखी कोणत्या कारणामुळं, आपण या अविश्वसनीय विश्वाचा घटक असल्याची कृतज्ञता त्यानं अनेक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं. 

6/8

सृष्टीच्या अगाध लीला, चंद्र, सूर्य, तारे, ग्रह या साऱ्यांमध्ये रमणारा सुशांत कायमच त्याच्या जिज्ञासू वृत्तीनं या गोष्टींकडे पाहत होता. 

7/8

एक अभिनेता म्हणून तो ज्या समर्पकतेनं वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका साकारत होता, त्याच समर्पकतेनं आणि आत्मियतेनं तो या निसर्गाशी जोडला गेला होता. 

8/8

सुशांतच्या पोस्टवर असणारे कॅप्शन पाहता हे अनोखं नातं नेमकं कशा स्वरुपाचं होतं याचा अंदाज येतो. अर्थात यापुढे मात्र अशा पोस्ट सोशल मीडियावर दिसणार नाहीत. कारण, ग्रहताऱ्यांमध्ये रमणाऱ्या एका अवलियानं जगाचा निरोप घेतला असून, तो खुद्द या ताऱ्यांमध्येच स्थान मिळवण्यासाठी गेला आहे.  सुशांत तू कायमच स्मरणात राहशील..... (सर्व छायाचित्रं- सुशांत सिंह राजपूत / इन्स्टाग्राम)