कंगना रानौतच्या ऑफिसचे Inside photo

कंगना रानौतच्या प्रोडक्शन हाऊस 'मणिकर्णिका फिल्म्स'वर बुधवारी कारवाई करण्यात आली.

Sep 09, 2020, 20:24 PM IST

काही महिन्यांपूर्वीच कंगनाने या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली होती. कंगनाने पाली हिल्सच्या बंगला क्रमांक 5ला आपला वर्क स्टुडिओ बनवलं. सेलिब्रिटी डिझायनर शबनम गुप्तासह तिने या बंगल्याला नवं रुप दिलं. 

1/5

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी कंगनाला दिलासा देत तिच्या कार्यालयावरील, बीएमसीकडून करण्यात आलेल्या कारवाईला स्थगिती दिली. 

2/5

कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. त्याआधी बीएमसीकडून एक नोटीस लावून अनधिकृत बांधकाम तोडण्याचं सांगितलं होतं. त्यानंतर थोड्याच वेळात बीएमसी अधिकारी कंगनाच्या कार्यालयाबाहेर पोहचले.

3/5

बीएमसी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात तोडफोड केली. जवळपास अडीच तासांच्या कारवाईनंतर बीएमसी कर्मचारी तेथून परतले. 

4/5

कंगनाने हा बंगला तीन वर्षांपूर्वी, जवळपास 20 कोटींना खरेदी केला होता. बंगला ग्राऊंड +2 मजली असून त्याला ऑफिसचं रुप देण्यात आलं आहे. 

5/5

मुंबईच्या पाली हिल्स भागात असलेला हा बंगला शबनम गुप्ता यांनी डिझाइन केला आहे. त्यासाठी 48 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.