Bollywood च्या या प्रसिद्ध अभिनेत्रींची नावं अंडरवर्ल्ड डॉनशी जोडली गेली आणि त्यांचं करिअरचं संपलं

जाणून घ्या या अभिनेत्रींशी संबंधित आणखी काही किस्से.

Jun 11, 2022, 22:09 PM IST

मोनिका बेदीपासून (Monica Bedi) मंदाकिनीपर्यंत (Mandakini) अनेक बॉलिवूड अभिनेत्री अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don) सोबत असलेल्या नात्यांमुळे चर्चेत आल्या होत्या. यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आणि त्या अभिनेत्रींचे करिअर उद्ध्वस्त झालं.

1/5

Monica Bedi

अभिनेत्री मोनिका बेदीचं नाव अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमशी जोडलं गेलं होतं. एकेकाळी या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल अनेक प्रकारच्या कथा चित्रपट मासिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या वादामुळे मोनिकाला तिचं करिअर थांबवावं लागलं. तिला तुरुंगाची हवा ही खावी लागली होती.

2/5

Anita Ayoob

अनिता अयुबचं नाव मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडलं गेलं आहे. एकेकाळी या दोघांचे किस्सेही खूप चर्चेत होते. अनिताला चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिला म्हणून एका चित्रपट निर्मात्याला आपला जीव गमवावा लागल्याचं देखील बोललं जातं

3/5

Mandakini

'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री मंदाकिनीचं नाव देखील दाऊद इब्राहिमशी जोडलं  गेलं. दोघेही एका क्रिकेट मॅचमध्ये स्टेडियममध्ये एकत्र स्पॉट झाले होते. मात्र, मंदाकिनीने या अफवांच नेहमीच खंडन केलं.

4/5

Mamta Kulkarni

अभिनेत्री ममता कुलकर्णीचं नाव प्रसिद्ध ड्रग स्मगलर विकी गोस्वामीसोबत जोडलं गेलं होत. या नात्याबद्दलच्या अफवांमुळे, ममताला अनेक प्रोजेक्ट गमवावे लागले आणि तिची कारकीर्द उद्ध्वस्त झाली. ममताने विकीशी लग्नही केले होतं. पोलिसांनी तिला एका ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती.

5/5

Sona

पूर्वीच्या काळातील सुंदर अभिनेत्री सोनाबद्दल मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जातं की डॉन हाजी मस्तान या अभिनेत्रीच्या पहिल्याच नजरेत प्रेमात पडला होता. पुढे जाऊन या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं होतं.