'प्रसुतीनंतर वाढलेल्या वजनामुळे सर्वांपासून दूर होते', अभिनेत्रीची कबुली

May 01, 2019, 11:44 AM IST
1/6

'प्रसुतीनंतर वाढलेल्या वजनामुळे सर्वांपासून दूर होते', अभिनेत्रीची कबुली

हिंदी कलाविश्वात आजवर बऱ्याच अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. यातीलच काही अभिनेत्री सध्याच्या घडीला सक्रीय नसल्या तरीही प्रेक्षकांमध्ये असणारी त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. अनेकदा लग्नानंतर किंवा कौटुंबीक जबाबदारी स्वीकारल्यानंतर अभिनय विश्वातून काढता पाय घेण्याच्याच निर्णयाला काही अभिनेत्री प्राधान्य देतात. पण, त्यामागे आणखीही काही कारणं असू शकतात आणि आहेतही. याविषयीच एका अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून माहितीही दिली आहे. प्रसूती आणि बाळंत पणानंतरच्या परिस्थितीविषयी त्या अभिनेत्रीने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. (छाया सौजन्य- @reddysameera)

2/6

'प्रसुतीनंतर वाढलेल्या वजनामुळे सर्वांपासून दूर होते', अभिनेत्रीची कबुली

आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याविषयी खुलेपणाने व्यक्त होणारी अभिनेत्री आहे, समीरा रेड्डी. 'रेस', 'टॅक्सी नंबर ९२११' या चित्रपटांतून झळकलेल्या समीरना प्रसूतीनंतर आपण नेमकं कशा प्रकारे अडचणींच्या प्रसंगांचा सामना केला होता, याविषयीची माहिती तिने या पोस्टमध्ये दिली. ज्यासोबत तिने २०१५ आणि २०१९ असे स्वत:चे दोन फोटोही पोस्ट केले. (छाया सौजन्य- @reddysameera)

3/6

'प्रसुतीनंतर वाढलेल्या वजनामुळे सर्वांपासून दूर होते', अभिनेत्रीची कबुली

पहिल्या बाळंतपणानंतर आपलं वजन जवळपास १०२ किलोंवर पोहोचल्याचं सांगत याविषयी मोकळेपणाने बोलण्यास आपल्याला कोणत्याच प्रकारची भीती किंवा संकोचलेपणा वाटत नसल्याचं तिने म्हटलं. त्या परिस्तिथीमुळे मला गोष्टी कठीण वाटू लागल्या होत्या. 'माझ्या आत्मविश्वासाला तडा गेला होता. इतकच नव्हे, तर जवळपास एक वर्षभरासाठी मी वजन कमीही करु शकले नव्हते. कारण, त्या वर्षभरात मी कुठे बाहेरच पडले नव्हते', असं समीराने लिहिलं आहे. (छाया सौजन्य- @reddysameera)

4/6

'प्रसुतीनंतर वाढलेल्या वजनामुळे सर्वांपासून दूर होते', अभिनेत्रीची कबुली

पहिल्या गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर समीरा फारशी माध्यमांसमोरही आली नव्हती. अनेक वर्षे झगमगाट, ग्लॅमर आणि प्रसिद्धीझोतात राहिल्यानंतर इतरांच्या आपल्याकडे पाहण्याच्या बदललेल्या दृष्टीकोनाचा सामना करण्याती ताकद नसल्याचा खुलासा खुद्द समीरानेच केला. पण, या परिस्थितीचाही तिने मोठ्या धीराने सामना केला. (छाया सौजन्य- @reddysameera)

5/6

'प्रसुतीनंतर वाढलेल्या वजनामुळे सर्वांपासून दूर होते', अभिनेत्रीची कबुली

आपल्याकडे लक्ष देत सारंकाही पूर्वपदावर आणण्यासाठी तिला दोन वर्षाहून अधिक काळ लागला. कोणत्याही प्रकारचं डाएट वगैरे न पाळता नैसर्गिकरित्या वजन कमी करण्याचा पर्याय तिने निवडला. ज्यासाठी तिने योगसाधना, व्यायाम अशा मार्गांची निवड केली. (छाया सौजन्य- @reddysameera)

6/6

'प्रसुतीनंतर वाढलेल्या वजनामुळे सर्वांपासून दूर होते', अभिनेत्रीची कबुली

स्वत:ला बदलण्याचं  धाडस करत इच्छा शक्तीच्या बळावरच अशक्य वाटा शक्य करता येतात, असा विश्वास तिने असंख्य महिलांना या पोस्टच्या माध्यमातून दिला. समीराने या प्रवासात तिला मोलाचं सहकार्य केलेल्या फिटनेस ट्रेनर, योगा प्रशिक्षक यांचेही आभार मानले. (छाया सौजन्य- @reddysameera)