नेस वाडिया या अभिनेत्रीसोबतच्या नात्यामुळे आले होते चर्चेत पण...

प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हे दोघे पाच वर्ष एकमेकांसोबत नात्यात होते

May 01, 2019, 09:35 AM IST

जपानच्या एका न्यायालयानं नेस वाडिया यांना ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावलीय. जपानमध्ये स्किईंगच्या सुट्टी दरम्यान ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर हा निर्णय सुनावण्यात आलाय. मार्चच्या सुरुवातीला उत्तर जपानी बेट होक्काइडो के न्यू चिटोज विमानतळावर त्यांना अटक करण्यात आली होती. 

1/5

वाडिया समूहाचे एकमेव वारस

वाडिया समूहाचे एकमेव वारस

नेस वाडिया भारतातल्या सर्वात श्रीमंत अशा एका व्यावसायिक कुटुंबातील व्यक्ती आहे. नेस वाडिया हे २८३ वर्ष जुन्या वाडिया समूहाचे एकमेव वारस आहेत. ४७ वर्षीय नेस वाडिया हे भारताचे प्रसिद्ध उद्योगपती नुस्ली वाडिया यांचे सर्वात मोठे पुत्र आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब क्रिकेट टीमचे ते सह-मालक आहेत. फोर्ब्सच्या माहितीनुसार, नेस वाडिया हे सात अब्ज किंमतीच्या संपत्तीचे मालक आहेत. वाडिया समूहात बिस्कीट कंपनी 'ब्रिटानिया इंडस्ट्रीज'पासून विमान कंपनी 'गोएअर' अनेक कंपन्यांचा समावेश आहे. 

2/5

प्रीती झिंटासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत

प्रीती झिंटासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत

याअगोदर आपलं खाजगी आयुष्य गुपितच ठेवणारे नेस वाडिया अभिनेत्री प्रीती झिंटासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आले होते. पाच वर्षांच्या नात्यानंतर या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं. 

3/5

लग्नाच्याही चर्चा

लग्नाच्याही चर्चा

प्रीती झिंटा आणि नेस वाडिया लवकरच लग्न करणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. ही जोडी खुपच सुंदर होती. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, लग्नासाठी नेस वाडियानं प्रीतीसमोर एक अट ठेवली होती. लग्नानंतर प्रीतीला फिल्मी दुनियेला बाजुला ठेवावं लागणार होतं. परंतु, प्रीतीनं ही अट धुडकावून लावली आणि दोघांचं नातं संपुष्टात आलं.

4/5

छेडछाडीचा आरोप

छेडछाडीचा आरोप

प्रीतीनं २०१४ साली नेस वाडिया यांच्याविरुद्ध छेडछाडीचा आरोप केला होता. दोघेही आयपीएल टीम किंग्ज इलेव्हन पंजाबचे सह-मालक होते. ३० मे २०१४ रोजी पंजाब किंग्स एलेव्हन आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल सामन्यादरम्यान प्रिती झिंटाला नेस वाडीयाने तिकीट वाटपावरुन आपल्या कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने सगळ्यांसमोर प्रितीशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप प्रीतीने केला होता.

5/5

चेहऱ्यावर जळती सिगारेट फेकली

चेहऱ्यावर जळती सिगारेट फेकली

३० मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये घडलेल्या घटनेपूर्वी नेसनं आपल्या चेहऱ्यावर जळती सिगारेट फेकली होती तसंच आपल्याला एका रुममध्येही बंद करून टाकलं होतं, असाही आरोप मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना लिहिलेल्या पत्रात प्रीतीनं केला होता. हे प्रकरण न्यायालयात चार वर्ष चाललं परंतु, नंतर दोघांनीही सामंजस्यानं हे प्रकरण हाताळलं... आणि प्रीतीनं तक्रार मागे घेतली.