Tunisha Sharma : तुनिषा हिने नाही तर याआधी या कलाकरांनीही उचललं टोकाचं पाऊल

आज आपण गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या आत्महत्येच्या यादीवर एक नजर फिरवणार आहोत. ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूत पासून ते संदीप नहार पर्यंतच्या कलाकारांची नावे जोडली आहेत. 

Dec 25, 2022, 16:30 PM IST

Tunisha Sharma : बॉलिवूड आणि टिव्ही इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी आत्महत्येच्या मार्गाचा स्वीकार करुन जगाचा निरोप घेतला. अशा अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांना मात्र खूप दुख झालं. असे अनेक कलाकार आहेत अजूनही त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेलं नाही. पण पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तर आज आपण गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या आत्महत्येच्या यादीवर एक नजर फिरवणार आहोत. ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूत पासून ते संदीप नहार पर्यंतच्या कलाकारांची नावे जोडली आहेत. 

 

1/7

indian actress suicide today, Bollywood Actress Who Committed Suicide, Latest Marathi News Bollywood

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 ला मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. सुशांतच्या मृत्यूचे अजूनही गूढ राहिलंय. वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी बॉलीवूडच्या या प्रसिद्ध कलाकाराने जगाचा निरोप घेतला. 

2/7

indian actress suicide today, Bollywood Actress Who Committed Suicide, Latest Marathi News Bollywood

प्रत्युषा बॅनर्जी (Pratyusha Banerjee) बालिका वधू, बिग बॉस सीझन 7 मधली स्पर्धक असणा-या प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिल 2016 मध्ये वयाच्या 24व्या वर्षी आत्महत्या केली होती. 

3/7

indian actress suicide today, Bollywood Actress Who Committed Suicide, Latest Marathi News Bollywood

वैशाली ठक्कर (Vaishali Takkar) ससुराल सिमर का आणि ये रिश्ता क्या कहलाता है यांसारख्या टीव्ही शोमध्ये दिसलेली अभिनेत्री वैशाली ठक्करनेही 16 ऑक्टोबर 2022 इंदूरमध्ये राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

4/7

indian actress suicide today, Bollywood Actress Who Committed Suicide, Latest Marathi News Bollywood

कुशल पंजाबी (Kushaal Punjabi) 37 वर्षांचा प्रसिद्ध टीव्ही अभिनेता कुशल पंजाबीने 26 डिसेंबर 2019 मुंबईतल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये अशी सूसाईड नोट त्याने लिहिली होती.

5/7

indian actress suicide today, Bollywood Actress Who Committed Suicide, Latest Marathi News Bollywood

संदीप नहार (Sandeep Nahar) 32 वर्षीय संदीप नहारने 16 फेब्रुवारी 2021 वैयक्तिक आणि व्यावसायिक समस्यांमधून जात असल्यानं आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली होती.

6/7

indian actress suicide today, Bollywood Actress Who Committed Suicide, Latest Marathi News Bollywood

प्रेक्षा मेहता (Preksha Mehta) क्राइम पेट्रोलसारख्या शो मध्ये काम केलेल्या अभिनेत्री प्रेक्षा मेहताने 26 मे 2020 पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  कोरोनाच्या काळात काम न मिळाल्याने नैराश्यात गेल्याने  आत्महत्या केली असं पोलिसांनी म्हटलं होतं.

7/7

indian actress suicide today, Bollywood Actress Who Committed Suicide, Latest Marathi News Bollywood

मनमीत ग्रेवाल (Manmeet Grewal) 32 वर्षीय मनमीत ग्रेवालने 15 मे 2020 ला आर्थिक संकट तसंच कर्ज फेडता न आल्याने आत्महत्येचं पाऊल उचललं होतं.