बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीनं 6 वर्षात दिला नाही एकही हिट! आता दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देईल का सुपरहिट?

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर 6 वर्ष या अभिनेत्रीनं एकही हिट चित्रपट दिला नाही. आता चक्क दाक्षिणेतील टॉप कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणार आहे ही अभिनेत्री. तुम्हालाही पडलाय का प्रश्न? मग चला जाणून घेऊया कोण आहे ती...

| Feb 21, 2024, 18:30 PM IST
1/7

कोण आहे ही अभिनेत्री?

या अभिनेत्रीचं नाव जान्हवी कपूर आहे. जान्हवीनं आजवर अनेक चित्रपट केले मात्र, कोणताही चित्रपट हिट ठरला नाही.

2/7

जान्हवी कपूर

जान्हवी कपूर ही लवकरच दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि सूर्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

3/7

बोनी कपूर यांचा खुलासा

बोनी कपूर यांनी आयड्रीम मीडियाशी बोलताना हा खुलासा केला, 'तिनं ज्युनियर एनटीआरसोबत चित्रपटाची शूटिंग केली आहे. आता राम चरणसोबत चित्रपट करणार आहे.' 

4/7

सूर्यासोबतही शेअर करणार स्क्रिन

बोनी कपूर यांनी सांगितलं की 'ती सूर्यासोबत हिंदीमध्ये एक चित्रपट करणार आहे. माझी इच्छा आहे की तिनं सगळ्या प्रकारचे चित्रपट करावेत.' 

5/7

कशी होती जान्हवीची रिअॅक्शन?

बोनी कपूर यांना जान्हवी कपूरची रिअॅक्शन विचारण्यात आली तर ते म्हणाले, 'ती खूप आनंदी आहे. ती सध्या स्टार्सची फॅन आहे आणि ही संधी मिळाल्यानंतर तिला खूप चांगलं वाटतंय, तर ती या सगळ्यासाठी आभारी आहे. तिला आहे की हे चित्रपट मोठ्या पडद्यावर चांगली कामगिरी करतील.'

6/7

कोणते चित्रपट करणार?

जान्हवी राम चरण आणि सूर्यासोबत चित्रपट करणार असून सध्या ज्या चित्रपटाची चर्चा आहे तो म्हणजे 'ज्युनियर एनटीआरचा देवारा हा चित्रपट. त्यात ती ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.' 

7/7

शेवटी कोणत्या चित्रपटात दिसली?

जान्हवी कपूरनं वरुण धवनसोबत 'बवाल' चित्रपटात दिसली होती. देवारा पार्ट 1 शिवाय तिच्याकडे 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' हा चित्रपट देखील आहे. (All Photo Credit : Janhvi Kapoor Instagram)