Destination Wedding साठी केला कोटींचा खर्च मात्र, रिसेप्शन देण्यास 'या' बॉलिवूड कपल्सनं केली कंजूसी

Bollywood Most Expensive Marriage: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलपासून राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रापर्यंत काही जोडप्यांनी त्यांच्या लग्नासाठी कोटी रुपयांचा खर्च केला. मात्र, या कपल्सच्या लग्नाच्या आमंत्रणाची किंवा मग रिसेप्शनच्या आमंत्रणाची फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी प्रतिक्षा करत राहिले. पण त्यांनी न लग्नाचे आमंत्रण दिले न रिसेप्शनचे... 

Jan 25, 2023, 18:04 PM IST
1/5

Bollywood Most Expensive Marriage

Katrina Kaif and Vicky Kaushal: अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांहे डिसेंबर 2021 मध्ये लग्न बंधनात अडकले. त्या दोघांनी राजस्थानमध्ये आलिशान पॅलेसमध्ये लग्न बंधनात अडकले. मात्र, चित्रपट सृष्टीतील काही मोजक्याच लोकांना आमंत्रण दिले होते. इतकंच काय तर लग्नात नाही मात्र, रिसेप्शनचे आमंत्रण असेल असे अनेकांना वाटत होते मात्र, ते झालेच नाही. 

2/5

Bollywood Most Expensive Marriage

Athiya Shetty and K L Rahul: क्रिकेटर केएल राहुलसोबत अभिनेत्री अथिया शेट्टीने खंडाळ्यात लग्न केले. त्यांच्या लग्नात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. त्याचवेळी अथिया आणि राहुलच्या रिसेप्शनची कोणतीही बातमी नाही.

3/5

Bollywood Most Expensive Marriage

  Rani Mukerji and Aditya Chopra: बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी त्यांचे लग्न अत्यंत गुप्त ठेवले होते. त्यांनी इटलीत गुपचूप लग्न केले, ज्यामध्ये बॉलिवूडचे मोजकेच लोक उपस्थित होते. त्याचवेळी लग्नाचा खुलासा करून मुंबईला परतल्यानंतरही त्यांनी रिसेप्शन पार्टी दिली नाही.

4/5

Bollywood Most Expensive Marriage

Rajkumar Rao and Patralekha: अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी चंदीगडच्या एका रिसॉर्टमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. एवढेच नाही तर मुंबईत परतल्यानंतरही दोघांनी रिसेप्शन पार्टी दिली नाही.

5/5

Bollywood Most Expensive Marriage

Farhan Akhtar and Shibani dandekar: अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी गेल्या वर्षी खंडाळ्याच्या फार्महाऊसवर लग्न केले, परंतु दोघांनी लग्नासाठी काही निवडक लोकांना आमंत्रित केले होते. त्यानंतर दोघे मुंबईतील हॉटेल ताजमध्ये रिसेप्शनमध्ये पार्टीचे आयोजन करतील अशी अनेकांना अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.