1/6
'जो जीता...' फेम पूजा बेदीच्या दुसऱ्या लग्नाविषयी मुलगी म्हणते....
हिंदी कलाविश्वात नव्वदच्या दशकात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये अनेकांच्याच आवडीचा चित्रपट म्हणजे 'जो जीता वही सिकंदर'. या चित्रपटातून आमिरच्या भूमिकेची जितकी प्रशंसा झाली. तितकीच प्रशंसा इतरही कलाकारांची झाली. ज्यामध्ये चित्रपटातील बोल़्ड लूकसाठी गाजलेल्या अभिनेत्री पूजा बेदी हिचाही समावेश होता. पूजाचा एकंदर लूक आणि त्यानंतरच्या काळात तिचीच सुरु असणारी चर्चा आजही चाहत्यांसाठी तितकीच हवीहवीशी. अशा या अभिनेत्रीची मुलगी अलाया एफ अर्थात अलाया फर्निचरवाला या कलाविश्वाच पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.
2/6
'जो जीता...' फेम पूजा बेदीच्या दुसऱ्या लग्नाविषयी मुलगी म्हणते....
अभिनेता सैफ अली खान, याच्यासोबत ती 'जवानी जानेमन' या चित्रपटातून झळकणार आहे. अलायाचा हा पदार्पणाचाच चित्रपट असल्यामुळे तिच्यावर याचं दडपण असणार हे नाकारताच येत नाही. चित्रपटाच्या प्रसिद्धीसत्रांना सुरुवात झाल्यामुळे अलाया सध्या मुलाखती, कार्यक्रमांनाही हजेरी लावत आहे. ज्यामध्ये ती मोठ्या आत्मविश्वासाने बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देत आहे.
3/6
'जो जीता...' फेम पूजा बेदीच्या दुसऱ्या लग्नाविषयी मुलगी म्हणते....
4/6
'जो जीता...' फेम पूजा बेदीच्या दुसऱ्या लग्नाविषयी मुलगी म्हणते....
5/6
'जो जीता...' फेम पूजा बेदीच्या दुसऱ्या लग्नाविषयी मुलगी म्हणते....
आपली आई जास्तीत जास्त काळ गोव्यामध्ये व्यतीत करत असून, येत्या काही दिवसांमध्ये ती मानेकसोबत लग्नगाठ बांधणार असल्याचा खुलासा तिने केला. 'एक व्यक्ती म्हणून मानेक फार चांगला आहे. तो आईला आनंदात ठेवेल', असं ती म्हणाली. २०१९मध्ये फेब्रुवारी महिन्यात पूजा बेदी आणि मानेक कॉन्ट्रॅक्टर यांचा साखरपुडा झाला होता. खुद्द पूजानेच एका सदराच्या माध्यमातून याची माहिती दिली होती.
6/6