Happy Birthday Ankush Chaudhary : प्रेक्षकांच्या कुटुंबात स्थान मिळवणारा 'डीएसपी'

Jan 31, 2020, 08:05 AM IST
1/5

Happy Birthday Ankush Chaudhary : प्रेक्षकांच्या कुटुंबात स्थान मिळवणारा 'डीएसपी'

काही कलाकार हे त्यांच्यातल्या कलाकाराहून जास्त एक व्यक्ती म्हणूनही लोकप्रिय असतात. अशाच चेहऱ्यांतील एक नाव आहे, अभिनेता अंकुश चौधरी याचं. चित्रपट कोणताही असो, त्यामध्ये अंकुशची कोणतीही भूमिका असो ती लोकप्रिय होणार यात शंकाच नसते. अशा या तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या आणि प्रेक्षकांना मनासोबतच त्यांच्या कुटुंबातही स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्याचा आज वाढदिवस. 

2/5

Happy Birthday Ankush Chaudhary : प्रेक्षकांच्या कुटुंबात स्थान मिळवणारा 'डीएसपी'

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनीही या लाडक्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. अंकुश म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांतूनच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता. नकळतच तो इतका मोठा स्टार असतानाही कट्ट्यावर बसणाऱ्या, हातात कटींगचा प्याला पकडणाऱ्या आपल्या अगदी जवळच्या मित्रासारखा वाटतो. एक अभिनेता म्हणून हे त्याने संपादन केलेलं यशच म्हणावं लागेल. 

3/5

Happy Birthday Ankush Chaudhary : प्रेक्षकांच्या कुटुंबात स्थान मिळवणारा 'डीएसपी'

अभिनेता असण्यासोबतच हा अंकुश कायमच त्याच्या कुटुंबालाही केंद्रस्थानी ठेवतो. त्याने मराठीतील “सुना येती घरा” या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं.  पुढे त्याने मराठीसोबतच हिंदी चित्रपटातही अभिनय केला. “जिस देश मे गंगा रेहेता है” हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट ठरला. 

4/5

Happy Birthday Ankush Chaudhary : प्रेक्षकांच्या कुटुंबात स्थान मिळवणारा 'डीएसपी'

२०१३ मध्ये 'दुनियादारी' या चित्रपटातून त्याने साकारलेली 'डीएसपी' म्हणजेच दिगंबर शंकर पाटील हा प्रत्येकासाठीच 'यारों का यार'चं सर्वोत्तम उदाहरण ठरला. 'आई शप्पथ', 'जत्रा', ‘यांचा काही नेम नाही’, 'रिंगा रिंगा', 'लालबाग परळ', ‘यंदा कर्तव्य आहे’, 'माझा नवरा तुझी बायको’, 'दगडी चाळ', 'ती सध्या काय करते' अशा चित्रपटांतून अंकुशने सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरुपी छाप सोडली. 

5/5

Happy Birthday Ankush Chaudhary : प्रेक्षकांच्या कुटुंबात स्थान मिळवणारा 'डीएसपी'

अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शक म्हणूनही त्याचं कौशल्य दाखवलं. केदार जाधवसोबत त्याने ‘अगंबाई अरेच्चा’ आणि ‘जत्रा’ या चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. तर, ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाव्दारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. एकंदरच या कलाविश्वात अंकुशची कामगिरी आणि त्याच्या नावाभोवती असणारं वलय याचा अनेकांना हेवा वाटत असला, अंकुश कलाकार म्हणून कितीही मोठा होत असला तरीही तो प्रेक्षकांच्या मनातीलच कलाकार राहील यात वाद नाही.