Sidharth Malhotra Kiara adwani wedding : 'ही' चिमुकली आज एका चित्रपटासाठी घेते 5 कोटींचं मानधन; कपूर कुटुंबातील सुनेशीच घेतलेला पंगा

आता तुम्ही म्हणाल या लहान मुलीचा आणि कपूर कुटुंबाच्या सुनेचा काय संबंध? तर, संबंध आहे. कसा तो एकदा वाचाच... 

Feb 06, 2023, 15:04 PM IST

Bollywood Affairs : बॉलिवूडमध्ये काही असे कलाकार आहेत ज्यांच्या खासगी आयुष्यात नात्यांची बरीच उलथापालथ पाहायला मिळाली आहे. एकीचा बॉयफ्रेंड, दुसरीचा पती हे असं चित्र बऱ्याचदा दिसून आलं आहे. अगदी कपूर कुटुंबातही असं काहीसं चित्र दिसलं होतं. जिथं या कुटुंबाची सून होण्यापूर्वी एका अभिनेत्रीच्या आयुष्यात करिअरच्या सुरुवातीला खास माणसाटी साथ होती. पण, हे नातं काही फार काळ टीकलं नाही. सध्या हे सर्व भूतकाळ झालं असलं तरीही नात्याची चर्चा मात्र कायमच होते. 

1/6

bollywood

Bollywood Sidharth Malhotra Kiara Advani Wedding actress childhood photos

तर, संबंध आहे. कारण या चिमुकलीनं मोठं होऊन सध्याची कपूर कुटुंबाची सून असणाऱ्या अभिनेत्रीशीच जणू पंगा घेतला होता. ही अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. 

2/6

Kiara Advani old photos

Bollywood Sidharth Malhotra Kiara Advani Wedding actress childhood photos

आलियानं रणबीर कपूरशी लग्न केलेलं असलं तरीही तिचं सिद्धार्थ मल्होत्राशी कधी एकेकाळी अफेअर होतं ही बाब अनेकजण विसरु शकलेले नाहीत. 

3/6

Kiara Advani as a kid

Bollywood Sidharth Malhotra Kiara Advani Wedding actress childhood photos

करिअरच्या सुरुवातीला आलिया आणि सिद्धार्थचं नातं बहरलं. पण, ते फार काळ टिकलं नाही. आलिया आणि सिद्धार्थमध्ये दुरावा आला आणि कालांतराने सिद्धार्थच्या आयुष्यात एक खास एंट्री झाली. 

4/6

Kiara Advani childhood photos

Bollywood Sidharth Malhotra Kiara Advani Wedding actress childhood photos

ती एंट्री होती किआरा अडवाणीची. अगदी बरोबर.... ही चिमुकली मुलगी दुसरीतिसरी कुणी नसून अभिनेत्री किआरा अडवाणी आहे. किआरानं अप्रत्यक्षपणे आलियाशी पंगाच घेतला होता. पण, त्या दोघींमध्ये कधीच कटुता पाहायला मिळाली नाही. 

5/6

Kiara Advani photos

Bollywood Sidharth Malhotra Kiara Advani Wedding actress childhood photos

किआराच्या बालपणाविषयी सांगावं तर, तिचे बाबा जगदीप एक व्यावसायिक, तर आई जेनेविव एक शिक्षिका होती. 

6/6

Kiara Advani sidarth malhotra

Bollywood Sidharth Malhotra Kiara Advani Wedding actress childhood photos

Sidharth Malhotra Kiara adwani wedding : किआरा हिंदी कलाजगतातील काही प्रतिष्ठीत कुटुंबांचा भाग आहे. अशोक कुमार आणि सईद जाफरी या बड्या कलाकांशी तिचं खास नातं खास आहे. खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी मागे ठेवत आता किआरा तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करु पाहत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशीच ती लग्नगाठ बांधणार आहे.