बॅट्सनचा किलर शॉट, जागेवर मोडलं बॉलरचं हाड, फोटो पाहून बसेल धक्का!

लाईव्ह सामन्यामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या तुम्ही यापूर्वी पाहिल्या असतील. नुकत्याच झालेल्या सामन्यात अशीच एक घडामोड घडली आहे. सामना सुरु असताना बॉल जोरात लागल्याने खेळाडूचं हाड मोडलं आहे. आयपीएलमध्ये केकेआरचा भाग असलेल्या खेळाडूला ही दुखापत झाली आहे.

Jan 02, 2023, 19:27 PM IST
1/5

लाईव्ह सामना सुरु असताना UAE चा क्रिकेटर अली खान याच्यासोबत ही घटना घडली आहे. ही दुखापत त्याला गोलंदाजी करताना झाली आहे. फलंदाजाचा शॉट थेट त्याच्या हातावर येऊन आदळला

2/5

त्याला झालेली दुखापत इतकी गंभीर आहे की, त्याचं हाडं मोडलं आलं. सध्या त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 

3/5

UAE चा वेगवान गोलंदाज सध्या हॉस्पिटलमध्ये भर्ती आहे. हॉस्पिटलमधून त्याचा एक फोटो देखील शेअर करण्यात आला आहे.

4/5

अली खानने शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा एक फोटो देखील शेअर केला आहे (Photo: Instagram/iamalikhan23)

5/5

या दुखापतीमुळे अली खान आता पुढील काही महिने क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे.