Marriage : लंडनची वरात महाराष्ट्राच्या दारात! भारतीय बौद्ध पद्धतीने पार पडला विवाह सोहळा

जातीपातीच्या भिंती तोडून भारतीय परंपरेनुसार हा विवाह सोहळा पार पडला. 

Feb 03, 2023, 18:22 PM IST

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर :  संभाजीनगर मध्ये गुरुवारी एक आगळावेगळा विवाह (Marriage) सोहळा पडला. संभाजीनगरची (Sambhajinagar ) सांची (Sachi) इंग्लंडच्या (British Man) एका मुलाच्या प्रेमात पडली, दोघांचे कुटुंब लग्नासाठी तयार झाले आणि अगदी भारतीय पद्धतीनं (Indian tradition) हा विवाह सोहळा गुरुवारी पार पडला. या लग्नासाठी खास लंडनहून वऱ्हाड आले होते.  चार दिवस हा लग्न सोहळा सुरु होता. 

 

1/5

वधू वर दोघांनीही लग्नाचा आनंद व्यक्त केला आहे. नवरदेव आता नवरीला घेऊन पुन्हा लंडनला रवाना होणार आहे. 

2/5

एडवर्ड सह त्याच्या कुटुंबीयांनी सुद्धा लग्नाच्या सर्व विधीत सहभाग घेतला. 

3/5

लग्नाच्या वरातीत एडवर्ड चे कुटुंबीय आणि रगडे कुटुंबीय एकत्र ताल धरला.

4/5

लग्न भारतात म्हणजे संभाजी नगरात व्हावं आणि तेही भारतीय बौद्ध पद्धती व्हावे अशी अट मुलाकडच्या मंडळींनी घातली होती. 

5/5

लंडनमध्ये राहणारा एडवर्ड संभाजीनगरच्या सांची नावाच्या तरुणीच्या प्रेमात पडला.  2019 पासून इंग्लंड मध्ये हे सोबत होते, 3 वर्षांनी घरी सांगितलं आणि घरच्यांनी लग्नासाठी होकार दिला.