अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साधेपणाने जिंकल मन; आतापर्यंतच्या Budget मधील खास साडी लूक
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी त्यांचा सलग 7वा अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्या नजरा असताना निर्मला सीतारमण यांचा साधेपणा त्यांच्या साडीतून दिसून आला.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला त्यांच्या मंत्रालयातून बाहेर पडल्या तेव्हा राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्यासह अर्थसंकल्प तयार करणारी टीमही त्यांच्यासोबत होती. निर्मला सीतारमण यांनी आज अर्थ मंत्रालयाबाहेर एका वेगळ्याच अंदाजात दिसल्या. प्रत्येक वेळेप्रमाणे तिच्या हातात लाल रंगाचा टॅब तर होताच, आज त्यांच्या पेहरावाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिने क्रीम रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीला जांभळ्या रंगाची बॉर्डर आहे.
निर्मला सीतारमण कायमच भारतातील खादी कपड्याला प्रोत्साहन आणि प्राधान्य देतात. कायमच निर्मला सीतारमण खादी कपड्याचं कौतुक करताना दिसतात. तसेच निर्मला सीतारमण यांच्या साडीचं कलेक्शन कायमच चर्चेचा विषय असतो. या साड्यांमधून त्यांनी कायमच परंपरा आणि वैयक्तिक शैली दोन्ही प्रतिबिंबित केल्या आहेत.
प्रत्येक वर्षी, अर्थसंकल्पीय सत्रादरम्यान निर्मला सीतारमण यांची साडी हा भारताच्या विविध प्रादेशिक कारागिरीचा उत्सव साजरा करणारा एक खास आकर्षणाचा विषय असतो. यावर्षी देखील त्यांची साडी चर्चेचा विषय आहे. यानिमित्ताने निर्मला सीतारमण यांच्या आतापर्यंतच्या अर्थसंकल्पातील साड्या पाहणार आहोत.