Budh Gochar 2023 : पुढील 2 महिने 3 राशींसाठी वरदान! राजकुमार बुध देणार अमाप संपत्ती आणि कीर्ती

Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार संपत्ती, बुद्धिमत्ता आणि तर्काचा दाता बुध ग्रह पुढील 2 महिने 3 राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना 1 ऑक्टोबपर्यंत अमाप धनलाभ होणार आहे.

Jul 30, 2023, 11:53 AM IST

Budh Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा याचा परिणाम 12 राशींवर दिसून येतो. धन, व्यापार, तर्क, संवाद, बुद्धिमत्ताचा कारक बुध ग्रहामुळे लोकांच्या आयुष्यात अचानक धनलाभाचे योग निर्माण होतात. 

 

1/8

बुध ग्रह सूर्याची रास सिंह राशीत असून 1 ऑक्टोबरपर्यंत तो इथे विराजमान असणार आहे. तीन राशीच्या आयुष्यात राजासारखं जीवन येणार आहे. 

2/8

या काळात बुध अस्त होणार आणि त्याचा उदय पण होणार आहे. याचा परिणाम लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. 

3/8

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप शुभदायी ठरणार आहे. तुमचं धैर्य आणि शौर्य पुढील दोन महिने वाढणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा आर्थिक फायदा होणार आहे. 

4/8

मेष (Aries)

अडकलेले पैसे परत मिळणार आहे. वादातून किंवा कुठल्या प्रकरणातून तुमची सुटका होणार आहे. भावा बहिणीचे सहकार्य मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे.   

5/8

वृषभ (Taurus)

बुधाचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांना खूप लाभदायक ठरणार आहे. या लोकांच्या जीवनात भौतिक सुख वाढणार आहे. तुम्हाला भरपूर पैसे अचानक मिळणार आहे. 

6/8

वृषभ (Taurus)

व्यावसायिक जीवनात मोठे यश मिळेल. तुम्हाला इच्छित पद आणि पैसा मिळेल. तुमच्या करिअरमधील प्रगतीमुळे तुम्हाला खूप दिलासा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.   

7/8

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी पुढील दोन महिने वरदान ठरणार आहेत. या लोकांचे भाग्य बुध ग्रहामुळे चमकणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. 

8/8

तूळ (Libra)

समाजात मानसन्मान वाढणार आहे. कार्यक्षेत्रात तुमचं पद वाढणार आहे. तुमची जुनी इच्छा पूर्ण होईल. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)