पर्यटकांसाठी बंद असलेला कोल्हापुरमधील 'हा' प्रसिद्ध धबधबा पुन्हा सुरु

सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातला राऊतवाडीचा धबधबा पुन्हा एकदा पर्यटकांसाठी सुरु करण्यात आला आहे. 

Jul 29, 2023, 21:34 PM IST

Rautwadi Waterfall Kolhapur : राज्यात सर्वदूर पाऊस सुरू झालाय. त्यामुळे पश्चिम घाटात डोंगरदऱ्यात सध्या असंख्य धबधबे वाहात आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला राऊतवाडीचा धबधबा. पर्यटक मोठ्या संख्येने या धबधब्याला भेट देतात.  मुसळधार पावासामुळे कोल्हापुर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला होता. खबरदारी म्हणून  राऊतवाडी धबधबा पर्यटकांसटी बंद करण्यात आला होता. आता मात्र, हा धबधबा पुन्हा सुरु झाला आहे. 

 

1/8

कोल्हापूरपासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा स्वच्छ आणि सुरक्षितही आहे.

2/8

सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे प्रशासनाने हा धबधबा पर्यटकांसाठी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

3/8

धबधबा ठिकाणी अनेक तरुणांकडून हुल्लडबाजी केली जाते यामुळे हा धबधबा पर्यटांसाठी बंद करण्यात आला होता.

4/8

राज्यासह कर्नाटक, कोकण, गोवा भागातून पर्यटक राऊतवाडी धबधब्याला भेट देत असतात.  

5/8

मुसळधार पावसामुळे हा धबधबा ओसंडून वाहातोय. येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. 

6/8

 या धबधब्याकडे जातानाचं निसर्गाची नयनरम्य दृष्यं मनाला मोहीत करतात.    

7/8

कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरीपासून हा धबधबा अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर आहे. 

8/8