फक्त 10 हजार रुपयांमध्ये सुरु करा 'हे' Business आणि खोऱ्याने पैसे कमवा ...

चा बिझनेस करू शकता तेही कमी खर्चात. इतकंच नाही तर यामध्ये तुमची कमाईही चांगली होईल.

Jun 05, 2022, 23:33 PM IST

तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुमचे हे स्वप्न आत्मनिर्भर भारत मिशनच्या माध्यमातून सहज साकार होऊ शकतं. या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कर्ज मिळू शकतं. आम्ही तुम्हाला अशा Business Idea सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या स्वत:चा बिझनेस करू शकता तेही कमी खर्चात. इतकंच नाही तर यामध्ये तुमची कमाईही चांगली होईल.

1/5

जर तुम्ही चांगले स्‍कॉलर असाल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही ऑनलाइन कोर्स सुरू करू शकता. (Start Your Online Classes). बँक, एसएससीपासून (SSC) सिव्हिल सर्व्हिसेसपर्यंतची तयारीही आता ऑनलाइन केली जात आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या  शिक्षणासाठी ऑनलाइन शिक्षकांचीही मागणी आहे. असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जे फक्त ऑनलाइन कोर्सेसमधून करोडोंची उलाढाल करत आहेत. यामध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागणार नाही.

2/5

घरबसल्या व्यवसाय करायचा असल्यास बेकरी प्रॉडक्टस बनवण्याची सुरुवात करु शकता. तुम्ही ब्रेड बनवायला सुरुवात करू शकता. तुम्ही ब्रेड बनवून बेकरी किंवा बाजारात पुरवू शकता. यामध्ये जास्त गुंतवणूक गरज नाही. ब्रेडला बाजारात कायम मागणी असते. तुम्ही फक्त 10,000 रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला गव्हाचे पीठ किंवा मैदा, मीठ, साखर, पाणी, बेकिंग पावडर किंवा ईस्ट, फूड आणि मिल्क पाउडर असे मटेरियल लागेल.

3/5

लहान मुलं आणि प्रौढ देखील युट्यूबच्या माध्यमातून कोटी रुपये कमावतात. तुम्ही कॅमेरा फ्रेंडली असाल आणि तुमच्याकडे कंटेंट असेल तर तुम्ही Youtube वर व्हीडिओ बनवून खोऱ्याने पैसे कमवू शकता. यासाठी तुमच्याकडे समज आणि सर्जनशीलता असायला हवी. भारतात असे हजारो युट्यूबर आहेत, जे घरबसल्या चांगले पैसे कमवत आहेत.

4/5

जर तुम्हाला लिहायचे असेल तर तुम्ही 'ब्लॉगिंग' (ब्लॉगमधून उत्पन्न) चांगले पैसे कमवू शकता. तुमच्याकडे लेखन कौशल्य असेल तर तुम्ही कुठेही बसून कमाई करू शकता. जर तुम्ही मोठ्या लेवलवर ब्लॉगिंग सुरू केले तर तुम्ही तुमची स्वतःची वेबसाइट देखील तयार करू शकता. त्याच्या प्रमोशनसाठीही अनेक प्लॅटफॉर्म आहेत. यामुळे, तुम्हाला काही महिन्यांत कमाई सुरू होईल.

5/5

जाहिरीतीला 35 वी कला म्हटलं जातं. तुम्हाला जाहिराती कशा तयार करायच्या आणि तुम्ही क्रिएटिव्ह असाल  तर  'एडव्हरटाईज कॅंपेन डेवलपर' हा पूर्णपणे ऑनलाइन व्यवसाय आहे. यासाठी तुम्हाला फक्त प्रशिक्षण पूर्ण कराव लागेल. त्यानंतर तुम्ही वेबसाइट तयार करून काम सुरू करू शकता. तुम्हाला हवं असल्यास गूगलवर सर्च करून अधिक माहिती मिळवू शकता. हे अभ्यासक्रम 21 दिवसांपासून ते 3 महिन्यांपर्यंत आहेत. यानंतर तुम्ही डिजिटल प्रमोशनमध्ये सहभागी होऊ शकता. यामध्येही तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही.  एकदा तुम्ही काम पूर्ण केले की, तुम्ही त्यातून लाखोंची कमाई करू शकता.