लग्नावरुन परतताना कारवरील नियंत्रण सुटलं अन्... बडूरकर कुटुंबियांनी गमावली दोन्ही मुले

लातूरच्या निलंगा-औसा मार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चौघांना जीव गमवावा लागला आहे. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे  

Mar 27, 2023, 14:31 PM IST

या भीषण अपघातानंतर निलंग्याच्या दत्तनगर भागात शोककळा पसरली आहे. दोन्ही जुळी गमावल्याने बडूरकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे

1/6

Nilanga-Ausa route

लातूरच्या निलंगा-औसा मार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत.

2/6

private hospital in Latur

अपघातातून वाचलेल्या जखमींना लातूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अपघातातील मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी एकाच कुटुंबातील आहेत.

3/6

latur accident news

निलंग्याच्या दत्तनगर भागातील व्यावसायिक सचिन बडूरकर हे आपल्या कुटुंबीयांसमवेत पुण्याहून घरी निघाले होते. ए लातूरच्या दिशेनं येत असताना निलंगा-औसा मार्गावरील उत्का पाटी भागात बडूरकर यांची कार पलटली. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे.

4/6

car accident

पुणे येथून लग्न समारंभ उरकून गावी परतताना हा भीषण अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाखाली जाऊन पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.

5/6

ausa hosptil

या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सचिन बडुरकर यांची जुळी मुले अमर (15) व जय (10) तसेच सचिन बडुरकर यांचा पुतण्या अंश किरण बडुरकर (10) आणि  मेव्हणा प्रकाश लक्ष्मण कांबळे (27) यांचा समावेश आहे.

6/6

nilanga latur

या अपघातात सचिन बडुरकर, त्यांची पत्नी आणि आणखीन एका व्यक्ती जखमी झाली आहे. लातूरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.