घटस्फोटानंतरही सिंगल आहेत हे बॉलिवूड स्टार

बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी लग्नानंतर घटस्फोट झाल्यावर पुन्हा दुसऱ्यांदा लग्न केलं नाही. 

Feb 26, 2020, 16:40 PM IST

काही कलाकार एकटे किंवा त्यांच्या मुलांसोबत राहतात. काही लिव्हइनरिलेशनमध्ये राहत आहेत.

 

1/6

हृतिक रोशन २००० मध्ये सुझेनसह लग्नबंधनात अडकला. परंतु २०१४ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. 

2/6

करिश्मा कपूरने व्यावसायिक संजय कपूरसह २००३ मध्ये लग्न केलं होतं. मात्र २०१६ मध्ये दोघं वेगळे झाले. करिश्मा तिच्या दोन मुलांसोबत राहते.

3/6

अमृता सिंह आणि सैफ अली खान १९९१ मध्ये विवाहबंधनात अडकले. पण २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. अमृता सिंह घटस्फोटानंतर सारा आणि इब्राहिम या तिच्या मुलांसोबत राहते.  

4/6

मनिषा कोयरालाने वयाच्या ४० नंतर लग्न केलं. २०१० मध्ये लग्न झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. मनिषाने पुन्हा लग्न केलं नाही.

5/6

कोंकणा सेनने २०१० मध्ये रणवीर शोरेशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०१५ मध्ये दोघेही वेगळे झाले. 

6/6

कल्किने २०११ मध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपशी लग्न केलं. पण २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. कल्कि सध्या लिव्हइनरिलेशनशिपमध्ये राहतेय.