आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या इवांका ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांची मुलगी इवांका ट्रम्प यांचा Ivanka Trump हा दुसरा भारत दौरा होता.

Feb 26, 2020, 14:23 PM IST

या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रेमाचं प्रतिक मानल्या जाणाऱ्या ताजमहालला भेट दिली. 

1/8

इवांका, डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पहिली पत्नी इवाना यांची मुलगी आहे. इवांका अनेकदा त्यांच्या वडिलांसोबत पाहायला मिळतात. इवांका यांनी मॉडेल म्हणून करियरची सुरुवात केली होती. ३८ वर्षीय इवांका बिजनेसवुमन आणि लेखिकाही आहेत.

2/8

इवांका ट्रम्प यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९८१ रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला.

3/8

इवांका ट्रम्प याआधी जून २०१९ मध्ये भारत दौऱ्यावर होत्या. 

4/8

इवांका यांनी मॉडेलिंगही केलं आहे. मॉडेलिंगवेळी इवांका अनेक मोठ्या बिझनेस मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकल्या होत्या. इवांका टेलिव्हिजन शो The Apprentice 5 मध्येही सहभागी झाल्या होत्या.

5/8

इवांका त्यांच्या स्वत:च्या लाईफस्टाईल ब्रँड  'The Apprentice'च्या सीईओ आहेत. या ब्रँडमध्ये कपडे, शूज आणि ज्वेलरीचा समावेश आहे. इवांका त्यांच्या वडिलांच्या रिअ‍ॅलिटी शो, 'द अ‍ॅप्रेंटिस'मध्ये बोर्डरूम जज म्हणूनही दिसल्या होत्या.

6/8

इवांका ट्रम्प यांची एका बिझनेस लंचवेळी Jared Kushnerशी भेट झाली होती. दोन वर्षांच्या डेटिंगनंतर इवांका यांनी यहूदी धर्म परिवर्तन केलं. आणि २००९मध्ये त्या लग्नबंधनात अडकल्या.

7/8

इवांका ट्रम्प आणि Jared Kushner यांचं २०१९८ मध्ये सुमारे १३५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास  ९१० कोटी रुपये उत्पन्न होतं. ट्रम्प प्रशासनात महत्वाची भूमिका निभावणार्‍या या जोडीने हे उत्पन्न रिअल इस्टेट, शेअर्स, बॉन्ड्स इत्यादीतून मिळवल्याची माहिती आहे.

8/8

इवांका ट्रम्प आणि Jared Kushner यांना तीन मुलं आहेत.