...तर कानफडात मारली असती; वैभव नाईकांना नारायण राणे यांचे प्रत्युत्तर

गेल्या काही दिवसांपासून कोकणातलं राजकारण चांगलंच तापल्याचे दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असून विरोधककांकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

Mar 18, 2023, 09:11 AM IST

1/6

narayan rane resignation

येत्या दोन महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे मंत्रिपद जाणार असल्याचा गौप्यस्फोट कुडाळ मालवण आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केला होता.

2/6

vaibhav naik vs narayan rane

आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरवणाऱ्या राणे यांचे राजकीय अस्तित्व भाजप ठवरणार आहे, असेही वैभव नाईक म्हणाले होते.

3/6

vaibhav naik

भाजपला आता राणेंची राजकीयदृष्ट्या गरज नसल्याने त्यांना आता पदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे सांगत वैभव नाईक यांनी राणेंना डिवचलं होतं.

4/6

narayan rane family

त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वैभव नाईक यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कुडाळ येथे निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.

5/6

narayan rane

हा वैभव नाईक भविष्य सांगायला लागला आहे. नारायण राणे दोन महिन्यात राजीनामा देणार. जसं की मी भेटून त्याला कानात सांगितले.

6/6

narayan rane vs vaibhav naik

त्याने कान पुढे केला असता तर कानफडात मारली असती. हा सगळा खोटारडेपणा आहे. मी केंद्रीय मंत्री आहे राजीनामा का देईल? असा सवाल नारायण राणे यांनी केला.