Vacation: बॅग भरो निकल पडो! मध्य रेल्वेच्या समर स्पेशल ट्रेनच्या 100 फेऱ्या

Summer Special Train 2023 :  या समर स्पेशल ट्रेन मुंबई, पनवेल तसेच पुणे येथून सुटणार आहेत. कोकणात आणि दक्षिणेकडील राज्यात फिरण्यासाठी या ट्रेन आहेत.  

Mar 30, 2023, 00:00 AM IST

Central Railway Summer Special Train 2023 : मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. यामुळे अनेकजण सुट्ट्याचे प्लान आखत आहेत.  अनेकदा ठिकाण निश्चित झाले तरी ट्रेनचे तिकीट मिळत नाही. मात्र, आता याचे टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, मध्य रेल्वे तर्फे  पाच समर स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. या ट्रेनच्या तब्बल 100 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. 

1/5

पुणे जंक्शन – अजनी स्पेशल  २२ फेऱ्या. दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्टेशन्सवर या ट्रेन थांबणार आहेत.

2/5

लोकमान्य टिळक टर्मिनस - कन्याकुमारी  मार्गावर 18 फेऱ्या. ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोडे, तिरूर, शोरानूर, त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टावलम, कोट्टाला  चेंगन्नूर, कायनकुलम, कोल्लम जंक्शन, तिरुवनंतपुरम सेंट्रल, नागरकोइल जंक्शन या स्टेशन्सवर या ट्रेन थांबणार आहेत.

3/5

पनवेल-सावंतवाडी रोड स्पेशल 20 फेऱ्या. रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्टेशन्सवर या ट्रेन थांबणार आहेत.  

4/5

पनवेल - करमळी स्पेशल 18 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि या स्टेशन्सवर या ट्रेन थांबणार आहेत.

5/5

पुणे - सावंतवाडी रोड मार्गावर स्पेशल 20 फेऱ्या चालणाऱ्या जाणार आहेत. लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्टेशन्सवर या ट्रेन थांबणार आहेत.