वर्ण, उंचीवरुन कायम हिणवलं! पण मानली नाही हार...स्नेहल शिदमला आज ओळखतो संपूर्ण महाराष्ट्र

Marathi Comedy Actress : अनेक मराठी विनोदी कलाकारांनी (Comedy Actress) आपल्या विनोदबुद्धीने आणि अभिनयाने (Comedy Actress) मराठी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला आहे. आज या मराठी विनोदी कलाकारांमध्ये एका नाव आवर्जुन घेतलं जातं ते म्हणजे स्नेहल शिदम (Snehal Shidam). झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa yevu Dya) या विनोदी कार्यक्रमातून स्नेहलने आज आपला वेगळा ठसा उमटवला आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, यांच्याबरोबर आज स्नेहल शिंदेही या कार्यक्रमातील महत्त्वाची कलाकार बनली आहे. पण हे यश एका रात्रीत मिळालेलं नाही.

Feb 24, 2023, 16:25 PM IST
1/7

चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमातून स्नेहल शिंदम आपल्याला खळखळून हसवते. सहज सोपा अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग यामुळे स्नेहलने छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमामुळे मराठी सृष्टीत ती आता स्थिरावली आहे. 

2/7

पण हे यश तिला सहज मिळालेलं नाही. दिसण्यावरुन तिला अनेकांनी हिणावलं, नाकं मुरडली. अभिनयाची आवड असूनही तिला कोणी उभं केलं नाही. अभिनेत्री काय, अभिनेत्रीची बहिण किंवा मैत्रीण म्हणूनही कुठल्याच साच्यात बसत नाहीस अशी नकारात्मक उत्तरं तिला ऑडिशनवेळी दिली जात होती. 

3/7

रंगाने काळी आहे, जाडी आहे, उंची नाही याची सारखी आठवण तिला पावलोपावली करुन दिली जात होती. कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी या गोष्टी तिच्या मनातून जात नव्हत्या. पण स्नेहलने कधी हार मारली नाही. अतिशय खडतर परिस्थितीतून तीने यशाला गवसणी घातली.

4/7

सर्वसामान्य कुटुंबातील स्नेहल चाळीतल्या एका छोट्याश्या घरात लहानाची मोठी झाली. शाळेत असतानाच तिला अभिनायाची आवड निर्माण झाली.  नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमात ती भाग घ्यायची. यात अभिनयासाठी तिला अनेक बक्षीसही मिळाली.

5/7

घरची परिस्थिती बेताची असल्याने स्नेहलची आई दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकाची कामं करायची. एका घरचे सर्व स्नेहलच्या नृत्याचा कार्यक्रम बघायला गेले होते. घरी परतल्यावर उंदरानी सर्व अन्नाची नासधूस केली होती. त्यानंतर तिच्या बाबांनी घराची डागडुजी केली. घर लहान असल्याने स्नेहला आपली बक्षिसंही विकावी लागली होती.

6/7

कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अनेक ठिकाणी ऑडिशन दिलं. पण तिच्या वाटेला रिजेक्ट हाच शब्द आला. मैत्रिणीच्या किंवा बहिणीच्या अभिनयासाठी तिला बोलावलं जायचं, पण भूमिकेत फिट बसत नसल्याचं सागंत तिला नकार दिला जायचा.

7/7

पण म्हणतात ना भगवान के घर देर है पर अंधेर नही. स्नेहलच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो क्षण अखेर आला. चला हवा येऊ द्या च्या होऊ दे व्हायरल या कार्यक्रमासाठी तीने फॉर्म भरला. या कार्यक्रमात तीने आपल्या अभिनयाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे तीने विजेतेपदही पटकावलं. या कार्यक्रमानंतर तीने अनेक मालिकांतून भूमिका साकरल्या आहेत. चला हवा येऊ द्या च्या मुख्य कलाकारांमध्ये आज स्नेहलने स्थान पटकावलं आहे.