मोर्ने मोर्केल गोलंदाजी प्रशिक्षक झाल्यानंतर 'या' बॉलर्सचं चमकणार नशिब

Bowling coach Morne Morkel : साऊथ आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलला भारतीय संघाचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. याची अधिकृत घोषणा लवकर होणार आहे.   

| Aug 17, 2024, 19:54 PM IST
1/5

मोर्ने मॉर्केल

प्रशिक्षक म्हणून सक्रिय असलेला मोर्ने मॉर्केल हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पहिली पसंती होती. अशातच आता मोर्ने मॉर्केलला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जलवा दाखवावा लागेल.

2/5

गोलंदाज

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या तीन प्रमुख गोलंदाजांवर टीम इंडियाची धास्त असते. परंतू इतर गोलंदाजांना तयार करण्याचं काम मोर्ने मॉर्केलकडे असेल.

3/5

मयंक यादव

टीम इंडियाचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा, युवा गोलंदाज मयंक यादव, तसेच आकाश दीप, हर्षित राणा, आवेश खान, उमरान मलिक असे वेगवान गोलंदाज आहेत, ज्यांच्यावर मोर्ने मॉर्केलला काम करावं लागणार आहे.

4/5

अर्शदीप सिंग

अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार यांसारखे गोलंदाज देखील किती प्रभावी ठरतील, याकडे मोर्ने मॉर्केलला लक्ष द्यावं लागणार आहे. तर स्पिनर्सवर देखील काम करावं लागेल.

5/5

स्पिनर्स

दरम्यान, स्पिनर्सच्या यादीत कुलदीप यादव, युझी चहल, अक्षर पटेल यांच्याशिवाय रवी बिश्नोईला आपल्या तालमीत तयार करावं लागणार आहे. तसेच फलंदाजांना देखील गोलंदाजी शिकवण्याचं तंत्र मॉर्केलकडे आहे.