रक्षाबंधनासाठी खास डिझाइनर, मिनिमल मेंदीचा ट्रेंड, लहानमुलांसाठी कार्टुनच्या डिझाइन

Rakshabandhan Special: श्रावण महिना आला की एकामागोमाग एक सण समारंभ सुरू होतात. यातील एक महत्वाचा आणि आतुरतेने वाट पाहिला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन. 

Aug 17, 2024, 17:22 PM IST

रक्षाबंधन जवळ आले की बहिणींची तयारी सुरु होते. राखी, नवीन कपडे आणि बरंच काही. सण असला की महिलांना, मुलींना हातावर मेंदी काढायला आवडते. वेगवेगळ्या सण-समारंभानुसार अनेक प्रकारची मेंदी काढली जाते. त्यात साध्या- सोप्या मेंदीला आज काल जास्त पसंती मिळताना दिसते. तर चला बघुया रक्षाबंधन स्पेशल मेंदी ट्रेंड. 

1/6

राखीची मेंदी

मेंदीमध्ये वेगवेगळ्या डिझाइन काढल्या जातात. त्यातच रक्षाबंधन स्पेशल राखीची नक्षी असलेली मेंदी लहान मुलींपासून मोठ्यापर्यंत महिला आवडीने काढतात.

2/6

भावा-बहिणीचे चित्र असलेली मेंदी

लहान मुलींना मेंदी काढण्याची भारी हौस असते. त्यांना साजेशी अशी भावा-बहिणीचं चित्र काढलेली मेंदी अतिशय गोड आणि आकर्षक दिसते. लहान मुले कार्टूनच्या डिझाइनची मेंदी काढायला जास्त पसंता देतात. 

3/6

दोन्ही हातावरील मेंदी

वर्षानुवर्ष काढली गेलेली मेंदी डिझाइन म्हणजे दोन्ही हातावर सारखीच मेंदी काढणे. हा मेंदीचा प्रकार कधीही काल बाह्य न होणारा आहे. 

4/6

मागील हातावरील मेंदी

संपूर्ण हातावर जास्त मेंदी न काढता फक्त मागील हातावरील मेंदी उठून दिसते. अनेकदा फुलांच्या नक्षी सोबत साखळी तयार करून मागच्या हातावर मेंदी काढली जाते. यात नखाच्या अवती-भोवती बोटांवर सुंदर नक्षी देखील काढली जाते.

5/6

अरेबिक मेंदी डिझाइन

कामाच्या धावपळीत महिला भरलेल्या मेंदीपेक्षा साध्या पण डिझायनर मेंदीला जास्त प्राधान्य देताना दिसतात. यात वेगवेगळ्या नक्षीचा वापर करून सुंदर मेंदी काढता येऊ शकते.

6/6

डिझायनर मेंदी

अनेकदा पारंपारिक मेंदी न काढता महिला डिझाइनर, मिनिमल मेंदीला पसंती देताना दिसतात. अशी मेंदी सगळ्या प्रकारच्या कपड्यांवर शोभून दिसते.