उरले अवघे काही तास! चंद्रग्रहण भारतात दिसणार का? तुमच्या 10 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या

Lunar Eclipse 2023 date time in India : 2023 वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रग्रहण शरद पौर्णिमेला आहे. ग्रहण ही एक भौगोलिक घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात ती अशुभ मानली जाते. चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का?, सूतक कालचा कालावधी काय आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. 

Oct 26, 2023, 21:45 PM IST
1/10

वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण कधी आहे?

2023 या वर्षांतील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबर 2023 येत्या शनिवारी शरद पौर्णिमेला आहे. 

2/10

चंद्रग्रहण भारतातही दिसणार का?

वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे. यापूर्वी पहिलं चंद्रग्रहण 5 मे रोजी वैशाख पौर्णिमेच्या झालं होतं. ते चंद्रग्रहण भारतात दिसलं नव्हतं. 

3/10

भारतात किती वाजता सुरु होईल?

दुसरं चंद्रग्रहण मध्यरात्री 01:06 वाजता सुरू होईल आणि 02:22 वाजेपर्यंत असणार आहे. भारतात या ग्रहणाचा एकूण कालावधी 1 तास 16 मिनिटं असेल.  

4/10

भारताशिवाय चंद्रग्रहण कुठे दिसेल?

भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया, हिंदी महासागर, अटलांटिक, दक्षिण प्रशांत महासागर, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामध्ये चंद्रग्रहण दिसणार आहे. 

5/10

चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी कधी सुरू होईल?

चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक सुरू होईल. वर्षातील दुसऱ्या चंद्रग्रहणातील सुतक 28 ऑक्टोबरला दुपारी 2:52 पासून सुरू होणार आहे. 

6/10

भारतात शेवटचं चंद्रग्रहण कुठे दिसणार?

तज्ज्ञांच्या मते, 2023 वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण भारतातील सर्व राज्यांमध्ये दिसणार आहे.

7/10

चंद्रग्रहण काळात काय करावं?

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात नकारात्मकता मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करा. तसंच देवाच्या मंत्रांचा जप करा. यावेळी शिजवलेल्या अन्नात तुळशीची पानं ठेवा. 

8/10

चंद्रग्रहण काळात हे करु नका

चंद्रग्रहण काळात अन्न खाऊ नये. शिवणकाम आणि विणकाम करू नये. या काळात पूजा करणे अशुभ मानले जाते. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. 

9/10

चंद्रग्रहण म्हणजे काय?

पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. या प्रक्रियेत अशी वेळ येते जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एकाच रेषेत येतात आणि सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो, परंतु चंद्रापर्यंत पोहोचत नाही. या घटनेला खगोलीय घटना म्हणून चंद्रग्रहण असं म्हटलं जातं.   

10/10

चंद्रग्रहण संपल्यानंतर काय करावं?

चंद्रग्रहण संपल्यानंतर सगळ्यात पहिले आंघोळ करून घरभर गंगाजल शिंपडावं. ग्रहण संपल्यानंतर पूजा करा. तसंच चंद्रग्रहण संपल्यानंतर दान करावं. यामुळे ग्रहणाचे दुष्परिणाम दूर होतात, अशी मान्यता आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी 24 तास' याची खातरजमा करत नाही.)