Ayodhya Ram temple : 30 वर्षांपूर्वी 'या' व्यक्तीने तयार केली होती राम मंदिराची ब्ल्यू प्रिंट

अयोध्येतील राम जन्मभूमी येथे श्रीराम मंदिराच्या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिराचे काम वेगाने पूर्ण होत असून शेवटचा टप्पा लवकरच पूर्ण होईल असे सांगण्यात येतंय. सध्या देशातील राम भक्तांना मंदिर पूर्ण होण्याची उत्सुकता लागली आहे. पण मग अनेकांना असा प्रश्न पडतो की, या राम मंदिराचे डिझाईन कोणी तयार केलं? 

Jan 04, 2024, 16:39 PM IST
1/7

chandrakant sompura ram mandir

भारतातील बहुतांश मंदिरांचा नकाशा तयार करणारे आर्किटेक्ट चंद्रकांत सोमपुरा यांनी राम मंदिराचे देखील डिझाईन तयार केले आहे. भारतात दोन शैलीची मंदिर बांधली जातात. एक म्हणजे द्रविड शैली. या शैलीची मंदिरं तुम्हाला दक्षिण भारतात पाहायला मिळतील. दुसरी शैली नगर शैली. नगर शैलीची मंदिरे तुम्हाला उत्तर भारतात दिसतील.

2/7

chandrakant sompura temple map

केवळ देशभरात नाही तर जगभरातील नगर शैलीतील मंदिरांचा नकाशा तयार करण्यात चंद्रकांत सोमपुरा सुप्रसिद्ध आहेत. चंद्रकांत सोमपुरा यांनी लंडनमधील प्रसिद्ध पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिर याचा नकाशा तयार केला होता तर सोमनाथ मंदिर आणि कोलकत्ता येथील बिर्ला मंदिर या मंदिरांचा देखील त्यांनीच नकाशा तयार केला होता. 

3/7

Chandrakant Sompura does not have any formal degree

तुम्हाला माहिती आहे का, राम मंदिराचे मॉडेल तयार करणाऱ्या चंद्रकांत सोमपुरा यांच्याकडे कोणत्याही वास्तुविशारदाची किंवा वास्तुशास्त्राची कोणतीही औपचारिक पदवी नाही. बिझनेस स्टॅंडर्डच्या एका अहवालात म्हटलं आहे की, चंद्रकांत सोमपुरा जे काही शिकले ते त्यांच्या वडिलांकडून शिकलेत. त्यांना पिढ्यानपिढ्या हा वारसा मिळत गेला. 

4/7

Sompura has built around 200 temples

भव्य मंदिरांचे नगर शैलीतील मॉडेल बनवण्यासाठी चंद्रकांत सोमपुरा यांना देशातूनच नव्हे तर जगातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. चंद्रकांत सोमपुरा यांना स्वतःला मंदिराचा शिल्पकार म्हणवून घेणं आवडतं. तसेच सोमपुरा यांनी देश विदेशात आत्तापर्यंत तब्बल 200 नगर शैलीची मंदिर बांधली आहे. 

5/7

chandrakant sompura next generation

इतकंच नव्हे तर नगर शैलीतील मंदिराचे बांधकाम कसं केलं जातं याचे देखील कसब त्यांनी आपल्या कुटुंबातील पुढच्या पिढींना शिकवलं आहे. कुटुंबातील सगळे सदस्य त्यांना मंदिर उभारणीच्या कामात हातभार लावतात.

6/7

Ram temple is 161 feet tall

राम मंदिराचे डिझाईन तयार करणारी ही पंधरावी पिढी आहे. राम मंदिर हे 161 फूट उंच आहे तर 28 हजार वर्ग मीटर क्षेत्रात उभारले गेले आहे.

7/7

Metals not used to build the Ram temple

राम मंदिर तयार करण्यासाठी स्टील व लोखंड या धातूंचा वापर केला नाही. त्या ऐवजी राम मंदिरासाठी गुलाबी दगड आणि बलुवा दगडाचा वापर केला आहे. असं सांगितलं जातं की, हे दगड जितके जुने होत जातात तितकेच ते मजबूत होतात. हजारो वर्षांपर्यंत मंदिर आहे तसेच राहील असे देखील सोमपुरा यांनी सांगितलं.