जगातले 5 देश, जिथे भारताच्या 10 हजाराचे होतात 50 लाख रुपये.. मनसोक्त करा शॉपिंग

Cheap and Best Foreign Tour : पर्यटन करायला कोणाला आवडत नाही. पण पर्यटनासाठी सर्वात मोठी समस्या असते ती पैशांची. देशात किंवा परदेशात फिरायचं म्हटलं तरी तुमच्या अकाऊंटमध्ये भरपूर पैसे असावे लागतात. पण तुम्हाला माहित आहे का जगात असे काही देश आहेत, जिथे अवघे 10 हजार रुपये घेऊन गेलात तरी खाऊन-पिऊन मनसोक्त शॉपिंग करु शकता. 

| Jul 18, 2024, 18:38 PM IST
1/6

जगातले 5 देश, जिथे भारताच्या 10 हजाराचे होतात 50 लाख रुपये.. मनसोक्त करा शॉपिंग

2/6

जर तुम्ही कमी पैशा परदेशात फिरण्याचा प्लान करत असाल तर इराण हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. फोर्ब्स इंडियाच्या वेबसाईट नुसार भारताचा एक रुपया इराणच्या 503 रुपयांइतका आहे. म्हणजे जर तुम्ही भारतातून 10 हजार रुपये घेऊन गेलात तर इराणमध्ये त्याचे 50 लाख इराणी रियाल होतील. इतक्या पैशात तुम्ही आराम आपली टूर एन्जॉय करु शकाल

3/6

स्वस्तात फिरण्यासाठी भारताचा शेजारचा देश म्हणजे व्हिएतनाम. व्हिएतनाममध्ये वियनामी डोंग हे चलन चालतं. इथे भारताचा एक रुपया व्हिएतनाममध्ये 306 रुपयांइतका आहे. भारतातून 10 हजार रुपये घेऊन गेल्यास 30 लाख वियतनामी डोंग इतके होतात. व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना विशेष सन्मान दिला जातोत.

4/6

इंडोनेशिया हे जगातील सर्वात मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. पण या देशावर भारतीय संस्कृतीचा प्रचंड पगडा आहे. इथल्या नोटांवर भगवान गणेशाची मुद्रा आहे. तर सरकारी एअरलाईनचं नाव गरुड एअरलाईन आहे. गेल्या काही वर्षात इंडोनेशियात परदेशी रुपयांमध्ये मोठी घसरण झाली आहे. भारताचा एक रुपया इंडोनेशियात 197 रुपयांइतका आहे. म्हणजे जर तुम्ही 10 हजार रुपये घेऊन गेलात तर इंडोनेशियात त्याचे 19 लाख 70 हजार रुपये होतात.

5/6

उझबेकिस्तान हा मध्य एशियातील महत्त्वाचा देश आहे. या देशाचे भारतासोबत व्यावहारिक संबंध आहे. आकाराने मोठ्या असलेल्या या देशाची अर्थव्यवस्था मात्र कमकुवत आहे. भारताचे 10 हजार रुपेय म्हणजे तिथे 15 लाख उझबेकिस्तान सोम इतके आहेत. इतक्या पैशात तुम्ही आरामात पर्यटन करु शकता.

6/6

कंबोडिया हा भारताच्या पूर्वेला असलेला सुंदर पहाडी देश आहे. या देशात जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे. कंबोडियाची आर्थिक स्थितीही नाजूकच आहे. भारताचे 10 रुपय म्हणजे तिथले 4 लाख 90 हजार कंबोडियाई रिल इतके आहेत. कंबोडियाई रील हे तिथल्या चलनाचं नाव आहे.