विवाहीत स्त्रिया कपाळी कुंकू किंवा टिकली लावण्याची 'ही' आहेत शास्त्रीय कारणे

पुराण काळापासूनच स्त्रिया कपाळी कुंकू लावतात. सौभाग्याचं प्रतिक असलेलं हे कुंकू कपाळी लावणं आरोग्यवर्धक देखील मानलं जातं.   

Jul 18, 2024, 17:34 PM IST
1/8

'एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू' देवदास सिनेमातील हा डायलॉग चांगलाच गाजला. या डायलॉगला आता विनोद म्हणून पाहिलं जात असलं तरी भारतीय संस्कृतीत कुंकूचं महत्त्व खूप आहे.     

2/8

हिंदू धर्मानुसार सौभाग्यवतींचा अलंकार म्हणून कुंकवाला मान दिला जातो. पुर्वीच्या काळी स्त्रिया  रुपयाच्या नाण्याएवढं मोठं कुंकू लावायच्या.   

3/8

मात्र काळ बदलत गेला तसं कुंकवाची जागा टिकलीने घेतली. याला जशी धार्मिक बाजू आहे, तशीच शास्त्रीय कारणं देखील आहेत. 

4/8

धार्मिकदृष्ट्या हळद, कुंकू, अष्टगंध आणि चंदनाला खूप पवित्र मानलं जातं.अध्यात्माप्रमाणे वैज्ञानिकदृष्ट्या देखील कपाळी टिळा लावण्याचे  खूप फायदे आहेत.  

5/8

हळद, कुंकू, चंदन हे जंतूनाशक आहेत. त्यामुळे ते कपाळी लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. 

6/8

कपाळाच्या मध्यभागी अग्नीचा प्रभाव असतो असं म्हणतात, त्यामुळे दोन भुवयांच्या मध्यभागी कुंकवाचा टिळा लावल्याने तणाव कमी होतो.

7/8

सतत चिंता आणि विचारांमुळे मेंदूवर अतिरिक्त ताण येतो, म्हणूनच कपाळी कुंकू लावल्याने मेंदू आणि मन शांत राहण्यास मदत होते. 

8/8

कुंकवाचा टिळा लावल्याने दोन भुवयांच्या मध्यभागी लावल्याने डोकेदुखीचा त्रास कमी होतो.