Photos: कवड्याची माळ, दांडपट्टा अन्... Chhaava मध्ये विकीने साकारलेले धाकले छत्रपती पाहून ऊर भरुन येईल

Chhaava Teaser Vicky Kaushal Photos: या चित्रपटाच्या टीझरमधील विकी कौशलचा लूक पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. विकीबरोबरच या ट्रेलरमध्ये औरंगजेबच्या भूमिकेमध्ये एक ज्येष्ठ अभिनेता दिसत आहे. विकीचा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील लूक पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पाहूयात धाकट्या छत्रपतींची भूमिका साकारताना मोठ्या पडद्यावर ती कशी साकारण्यात आली आहे त्याचे काही खास लूक...

| Aug 19, 2024, 12:16 PM IST
1/13

vicky kaushal Chhaava Looks

अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची पहिली झलक शेअर केली आहे.  

2/13

vicky kaushal Chhaava Looks

विकी कौशलच्या या चित्रपटाचं नाव 'छावा' असं असून या चित्रपटाचा अंगावर काटा आणणाऱ्या टीझरमधील लूक चर्चेचा विषय ठरतोय.  

3/13

vicky kaushal Chhaava Looks

'छावा'मधील या टीझरमध्ये संभाजी महाराज लढताना दिसत आहेत. 

4/13

vicky kaushal Chhaava Looks

विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांचा आवेश आपल्या अभिनयामधून अगदी परेफेक्ट साकारल्याचं दिसत आहे.

5/13

vicky kaushal Chhaava Looks

रक्ताने माखलेले कपड्यांसहीत अगदी आवेशामध्ये संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा विकी शत्रूवर तुटून पडताना या ट्रेलरमध्ये दिसतो.

6/13

vicky kaushal Chhaava Looks

कधी हातात दांडपट्टी तर कधी साखळ्यांच्या मदतीने विकी शत्रूवर हल्ले करताना दिसत आहे.

7/13

vicky kaushal Chhaava Looks

गळ्यात कवड्याची माळ, लांब केस, दाढी सारं काही विकीने अगदी उत्तम पद्धतीने कॅरी केल्याचं ट्रेलर पाहिल्या क्षणी जाणवतं.

8/13

vicky kaushal Chhaava Looks

अक्षय खन्नाने औरंगजेबच्या भूमिकेत टीझरमध्ये दिसून येत आहे.

9/13

vicky kaushal Chhaava Looks

'शिवाजी गेला मात्र आपला विचार मागे ठेऊन गेला', असा संवाद औरंगजेबच्या तोंडी या टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे.

10/13

vicky kaushal Chhaava Looks

'छावा'चा ट्रेलर शेअर करताना विकीने स्वराज्य रक्षक, धर्माचं संरक्षण करणारा हा छावा आहे असं म्हटलं आहे.  

11/13

vicky kaushal Chhaava Looks

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केवळ विकी कौशल आणि अक्षय खन्ना दिसले असले तरी चित्रपटात अनेक नावाजलेले कलाकार आहेत. यामध्ये रश्मिका मंधाना, अशुतोष राणा, दिव्या दत्ता याचबरोबर इतरही कलाकारांचा समावेश आहे.

12/13

vicky kaushal Chhaava Looks

ट्रेलरच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराज सिंहासनावर आरुढ दिसत असून छत्रपती संभाजी महाराज की जयचा जयघोष ऐकू येतो.

13/13

vicky kaushal Chhaava Looks

'छावा' हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं समजतं.