राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंचर छगन भुजबळ हेच शरद पवार यांचे पहिलं टार्गेट का?

राष्ट्रवादीतल्या बंडानंतर शरद पवारांनी पहिलं टार्गेट केलं ते छगन भुजबळांना. तर, भुजबळांनीही पवारांवर जोरदार पलटवार केला. पवार आणि भुजबळांमध्ये कशी राजकीय लढाई सुरू झाली.

Jul 09, 2023, 22:15 PM IST

Sharad Pawar On Chagan Bhujbal : राष्ट्रवादीतल्या बंडानंतर शरद पवार पेटून उठलेत. 82 वर्षांच्या पवारांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला असून, त्यांनी पहिली जाहीर सभा घेतली ती भुजबळांच्या बालेकिल्ल्यात. येवलामध्ये... अर्थात भुजबळ हे देखील कच्च्या गुरूचे चेले नाहीत. पवारांच्याच तालमीत तयार झालेल्या भुजबळांनी माफीवरून जोरदार पलटवार केला.

1/8

2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीतर्फे मंत्री म्हणून पहिली शपथ भुजबळांनीच घेतली. 

2/8

2009 मध्ये पुतणे समीर भुजबळ नाशिकमधून खासदार झाले. 

3/8

2009 आणि 2014 मध्ये पुत्र पंकज भुजबळ नांदगावमधून आमदार म्हणून निवडून आले.

4/8

2004 पासून आतापर्यंत चारवेळा भुजबळ येवला मतदारसंघातून आमदार झाले. 

5/8

1999 मध्ये काँग्रेस आघाडी सरकारमध्ये ते राष्ट्रवादीचे पहिले उपमुख्यमंत्री बनले. 

6/8

1999 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांना पहिलं प्रदेशाध्यक्ष बनवलं. 

7/8

भुजबळांना मंत्रीपद देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं.

8/8

1991 साली शिवसेनेत बंड घडवून शरद पवारांनीच भुजबळांना काँग्रेसमध्ये आणलं