भारतातील 'या' ठिकाणी लग्नाआधी राहावं लागतं लिव्ह-इनमध्ये, अन्यथा...

भारत लोकसंख्येच्यादृष्टीने सर्वात मोठा देश आहे. देशात प्रांतानुसार भाषा, परंपरा, संस्कृती बदलत जाते. प्रत्येक राज्यानुसार निरनिराळे सणदेखील साजरे केले जातात. मात्र भारत देशात असं एक राज्य आहे तेथील समुदायातील नागरिकांना लग्नाचा निर्णय घेण्याआधी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहावं लागतं. प्रत्येक नागरिकांसाठी हा नियम आहे.

May 19, 2023, 15:16 PM IST

1/6

अलीकडे लिव्ह-इन रिलेशनशिपचा ट्रेंड देशातील प्रत्येक भागात पाहत असल्याचे आपण पाहतो. अनेक जोडपी लग्नाचा निर्णय घेण्याआधी लिव्ह-इनमध्ये राहणं पसंत करतात. पण भारतातही असं एक ठिकाण आहे जिथे पुर्वापार लग्न करण्यापूर्वी लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहण्याची प्रथा चालत आली आहे. 

2/6

भारतातील छत्तीसगढ या राज्यातील एका समुदायाकडून ही प्रथा पुर्वापार चालत आली आहे. या समुदायाचे नाव मुरिया आहे. यांना मुडिया नावानेही ओळखलं जातं. या समाजातील तरुण-तरुणी लग्नाआधी एकमेकांची ओळख व्हावी यासाठी लिव्ह इनमध्ये राहतात. 

3/6

लग्नाआधीच लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी घरातील सदस्य आणि कुटुंबातील व्यक्ती मदत करतात. इतकंच, नव्हे तर घराबाहेर एक छोटे घरही त्यांच्यासाठी तयार केले जाते. याला घोटुल असं म्हणतात. यात काही दिवसांसाठी ते एकत्र राहतात. 

4/6

घोटुल गवत आणि बांबूंपासून तयार केले जातात. छत्तीसगढमधील बस्तर जिल्ह्यासह अन्य ठिकाणी हा समुदाय आढळतो. काही भागात त्यांना माडिया नावानेही ओळखतात.   

5/6

एका मिडीया रिपोर्टनुसार, घोटुलमध्ये राहणाऱ्या तरुणाला चेलिक म्हणतात तर मुलीला मोटियारी असं म्हणतात. येथील लोक या नियमांचे पालन करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करतात. काहि दिवस एकमेकांसोबत राहून नंतरच ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. 

6/6

या समाजाचा आणखी एक नियम आहे. समाजातील तरुण आणि तरुणी केवळ त्यांच्याच समुदायातील मुलांशी लग्न करु शकतात. इतर समुदायातील व्यक्तीशी लग्न करण्याबाबत समाजाचा विरोध आहे.