गणेशोत्सव मंडळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दिलासा; पुढच्या 5 वर्षांची चिंता मिटली

 गणेशोत्सव मंडळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. 

| Sep 15, 2023, 07:45 AM IST

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई :  गणेशोत्सव साजरा करणऱ्या गणेश मंडळांना संबधीत महापालिका तसेच आस्थापनेची परवानगी घ्यावी लागते. दरवर्षी गणेशोत्सवाचा मंडप उभारण्याआधीच मंडळांना परवानगी घ्यावी लागते.  गणेशोत्सव मंडळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दिलासा दिला आहे. 

1/7

गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांना पाच वर्षांची परवनागी एकदाच मिळणार आहे. 

2/7

 19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होणार आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे.  

3/7

मुंबईसह राज्यभरात हजारो गणेश मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. दरवर्षी परवनागी घेण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोठी कसरत करावी लागते.

4/7

 दरवर्षी परवानगी घेण्याची अट शिथील करण्यात आल्यामुळे आगामी वर्षांसाठी गणेश मंडळांना आणखी उत्कृष्ट नियोजन करता येणार आहे. 

5/7

या निर्णयामुळे गत दहा वर्षांत सर्व नियम, कायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे.

6/7

गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षे उत्सव साजरा करण्यासाठी एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. 

7/7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांना दिल्या जाणाऱ्या परवानगी बाबत मोठा निर्णय घेण्यात आला.