पृथ्वीवर इथं आहे स्वर्गाचं दार? थेट स्वर्गात पोहचवणारी रहस्यमयी गुहा

डोंगरावरील मंदिर परिसरात लोकांनी श्रद्धेनं लाल कापडी निशाणं झाडांना बांधलीयेत. या लाल कापडी निशाणांमुळे त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडलीय. 

Mar 30, 2024, 23:34 PM IST

Hawaii Haiku Stairs : स्वर्ग ही अशी संकल्पना आहे ज्या संकल्पनेचीच माणसाला कायम भुरळ पडत राहिलीय. मेल्यावर माणूस स्वर्गात जातो असं म्हणत असले तरी तुम्हाला जिवंतपणीच स्वर्गाचं दार पाहायचं असेल तर तुम्हाला एकदा तरी चीनच्या तियनमेन पर्वतरांगांमध्ये जावंच जागेल.. डोंगर माथ्यावरचा मंदिर परिसर तुम्हाला स्वर्गात आल्याची अनुभूती देतो.  डोळ्याचं पारणं फेडणारं निसर्गसौंदर्य तुम्हाला स्वर्गाची अनुभूती देतं.

1/7

चीनच्या हुनान प्रांतातल्या तियनमेन डोंगररांगांमध्ये स्वर्गाचं दार आहे.  चीनी भाषेत तियनमेनचा अर्थ स्वर्गाचं दार असाच होतो.

2/7

तियनमेन डोंगर रांगेला विशाल भोक पडलंय. त्या स्वर्गाच्या दारापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बनवण्यात आल्यात. या भागातून हिरवागार परिसर डोळ्यात साठवता येतो.

3/7

डोंगरमाथ्यावर पर्यटकांची पारदर्शक सज्जे तयार करण्यात आलेत. या सज्ज्यांवरून तुम्ही संपूर्ण परिसर न्याहाळू शकता.

4/7

स्वर्गाचं दार म्हणवल्या जाणाऱ्या गुहेजवळ जवळपास पाच एकरवर मंदिर आहे. या मंदिराच्या पायऱ्या चढून जाणं मजेदार असतं.   

5/7

घाटरस्त्यानं जायचं असेल तर 11 किलोमीटरचा नागमोडी रस्ताही आहे.   

6/7

37 अंशाच्या कोनातून सरळ डोंगरमाथ्यावर जाण्याचा अनुभव अवर्णनीय असा असतो.

7/7

या डोंगररांगांमध्ये जाण्यासाठी जगातल्या सर्वात लांबीच्या म्हणजेच जवळपास साडेसात किलोमीटर लांबीच्या केबलकारनं जावं लागतं.