चीनची पेंगाँग लेक परिसरातून माघार; टँक घेतले मागे

Feb 11, 2021, 19:09 PM IST
1/9

फिंगर 8 च्या स्थितीवर पुन्हा जाणार चीन सैन्य

फिंगर 8 च्या स्थितीवर पुन्हा जाणार चीन सैन्य

चीन पेंगांगच्या उत्तरी किनाऱ्यावर फिंगर एरियामध्ये फिंगर 8 च्या स्थितीवर पुन्हा परतणार आहे. येथे चीनचे सिरिजाप 2 नावाचे पोस्ट आहे. जेथे पेंगांगमधील पेट्रोलिंग करता बोटी तैनात केल्या जातात. भारतीय सैनिक देखील आपल्या पहिल्या स्थितीवर म्हणजे फिंग 3 आणि फिंगर 2 च्या मध्ये आपल्या धनसिंह थापा बेसपर्यंत परतले. भारत वादाच्या सुरूवातीपासून सांगत आहे की, चीन पहिल्यांदा फिंगर 8 च्या मागे जा त्यानंतर चर्चा होईल.

2/9

या परिसरात आता पेट्रोलिंग नाही

या परिसरात आता पेट्रोलिंग नाही

फिंगर 3 ते फिंगर 8 पर्यंत पेट्रोलिंग करण्यातबाबत दोन्ही देशांच्या कमांडरमध्ये चर्चा होणार आहे. तोपर्यंत कोणत्याही देशाचं सैनिक या परिसरात पेट्रोलिंग करणार नाही. दोन्ही देश चरणबद्ध पद्धतीने आपली सेना हटवणार आहे. म्हणजे इंफेंट्री, टँक, बख्तरबंग गाड्या, तोफखाना सगळं मागे घेणार आहेत. गेल्या 9 महिन्यात तयार करण्यात आलेले सगळे मोर्चे मागे घेण्यात आले आहेत.

3/9

दोन्ही देशातील कमांडर करणार चर्चा

दोन्ही देशातील कमांडर करणार चर्चा

पेंगांग किनारा सोडला तर दोन्ही देशातील सैनिकांमध्ये गंभीर वाद सुरू आहे. दौलत बेग ओल्डीपर्यंत पसरलेल्या रस्त्यावर हा वाद आहे. डीबीओच्या अगोदर डेपसांग मैदानावर अनेक मोर्चांवर दोन्ही देशातील सैनिक आमने-सामने आले. रक्षामंत्री संसदेत म्हटलं होतं की, दोन्ही देशातील सैनिक 48 तासांपर्यंत समजुतदारपणा दाखवलतील. शुक्रवारी दोन्ही देशातील कमांडर चर्चा करतील. 

4/9

9 व्या चर्चेत सैन्यांच्या परतीचा झाला निर्णय

9 व्या चर्चेत सैन्यांच्या परतीचा झाला निर्णय

दोन्हीकडून जवळपास 50-50 हजार सैनिक एकमेकांसमोर तैनात आहे. चीनची दो मोटराउज्ड डिविजन आणि टँक-बख्तरबंद गाड्या लडाखमध्ये तैनात आहेत. दोन्ही देशांच्या कोर कमांडरची नवव्यांदा चर्चा झाली. ही चर्चा 24 जानेवारी रोजी 16 तास चालली. यानंतर दोन्ही सेनेच्या परतीवर निर्णय घेण्यात आला. 

5/9

गलवानमध्ये भारतीय सेनेने दाखवला पराक्रम

गलवानमध्ये भारतीय सेनेने दाखवला पराक्रम

भारत आणि चीनसोबत तणावाची सुरूवात ही 5 मे 2020 रोजी पेंगांग तलावाच्या फिंगर 4 के जवळ झाली. दोन्ही सैनिकांमध्ये यावेळी झडप झाली आणि वादाला सुरूवात झाली. चीनने या परिसरात फिंगर 5 पर्यंत रस्ता बनवला आहे. या रस्त्याच्या पुढे येण्याचा प्रयत्न केला जात होता.  चीनने गलवान नदीवर भारतीय सैनिक तयार करत असलेल्या पूलला कडाडून विरोध केला होता. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये मोठी टक्कर झाली. हा पूल भारताच्या हद्दीत येऊनही हा वाद सुरू झाला. 

6/9

दोन्ही देशांच्या LAC वर फौजफाटा वाढवला

दोन्ही देशांच्या LAC वर फौजफाटा वाढवला

यानंतर हा वाद पूर्ण लडाखच्या पूर्व भागात पसरला. चीनने बख्तरबंद गाड्या आणि टँकरला दोन डिविजनमध्ये लडाख पूर्वमध्ये तैनात केलं. सोबतच LAC वर सैनिकांच्या संख्या 50 हजारांपर्यंत पोहोचवली. भारतीय सैन्याने देखील याला सडेतोड उत्तर देताना दौलत बेग ओल्डी ते रेजांगपर्यंत पाच डिविजन सैन्य तैनात केले.सगळ्यात आधुनिक टी-90 सह टँकरदेखील तैनात केले.

7/9

जेव्हा वाटलं तणाव संपला

जेव्हा वाटलं तणाव संपला

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कोर कमांडरांच्या बैठकीत गलवानच्या दक्षिणमधील पेट्रोलिंग प्वाइंट 14, 15, 17 एसह पेंगांग तलावाच्या किनाऱ्यावरून सेनेचा परतीच्या विषयावर चर्चा झाली आणि वाद संपला. मात्र चीनमध्ये 15 जूनच्या रात्रीपासून 16 च्या बिहार रेजिमेंटमधील सैनिकांवर धोक्याने हल्ला करण्याचा तणाव संपला. मात्र 15-16 जूनच्या रात्रीच्या वादात भारताचे 20 आणि चीनचे 45 सैनिक मारले गेले. यानंतर तणाव वाढला. 

8/9

भीषण सर्दीत देखील सज्ज होते भारतीय सैनिक

भीषण सर्दीत देखील सज्ज होते भारतीय सैनिक

29-30 ऑगस्ट रोजी भारतीय सेनेने पेंगांग झीलच्या किनाऱ्यावर जवळपास 70 किमीवर पसरलेल्या डोंगरावर ताबा मिळवला. यामध्ये रेजांग ला, रेचिन ला आणि मुखपत्रीचा देखील समावेश होता. यामध्ये शक्ती संतुलनाचा पगडा भारताकडे झुकलेला होता. भारतीय सेनेच्या स्पेशल फोर्सेज फिंगरमध्ये 4 के जवळच्या अनेक डोंगरावर ताबा मिळवला होता. जेथून ते चिनी सैनिकांवर भारी पडत होते.  

9/9

अखेरचा वादाचा असा झाला शेवट

अखेरचा वादाचा असा झाला शेवट

संपूर्ण हिवाळा या वादाला सोडवण्यात गेला. कोर कमांडर स्तरावर चर्चा झाली मात्र समाधान काही निघालं नाही. ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या आठव्या चर्चेत सैनिकांच्या परतीच्या मार्गावर चर्चा झाली मात्र काही झालं नाही. भारतीय सेनेने पहिल्यांदाच एवढ्या कठिण प्रसंगाचा सामना केला. मात्र भारतीय सैनिकांचा विचार पक्का होता. नवव्या बैठकीत 24 जानेवारी रोजी झालेल्या या चर्चेत वादाच्या शेवटची सुरूवात झाली आहे.