Maruti Suzuki च्या नव्या कार बाजारात दाखल : First Look

Feb 11, 2021, 17:50 PM IST
1/6

मारुति सुझुकी सेलेरियो 2021

मारुति सुझुकी सेलेरियो 2021

मारुती सुझुकीची ही कार बजेट आणि छोटी कार आहे. ही पहिली बजेट कार असून जी AMT च्या सुविधासह सज्ज आहे. न्यू जनरेशन सेलेरियाला सेलेरिया एक्स नावं दिलं आहे. या कारच्या लूकमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, ही कार जवळपास 21.63 KMPL एवढं मायलेज देत आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 4.99 लाख रुपये ते 5.79 लाख इतकी आहे. 

2/6

मारुति सुजुकी XL5

मारुति सुजुकी XL5

ही कार वॅगनारची प्रीमियम वर्जन आहे. जी आपल्याला Ertiga आणि XL6 सोबत बघायला मिळत आहे. XL5 ला नेक्सा डिलरशिपसोबत विकलं जात आहे.  XL5 चं एलईडी डीआरएल आणि आलिशान इंटिरिअर सारखी प्रीमियम सुविधांची अपेक्षा आहे. ही कार सप्टेंबर 2021 मध्ये लाँच होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कंपनी या वॅगनार 5-स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AMT या दोन्ही कारमध्ये समान ट्रान्समिशन देऊन सादर करणार आहे.

3/6

बलेनो फेसलिफ्ट

बलेनो फेसलिफ्ट

मारूतीची प्रीमियम हॅचबॅक बलेनो फेसलिफ्ट यावर्षी मार्च महिन्यात लाँच होण्याची आशा आहे. या कारमध्ये सनरुफ आणि टर्बो पेट्रोल इंजीन सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. आरएस (RS) मॉडेलच्या देखील फेसलिफ्टसोबत परत आणणार आहेत. या कारची एक्स शोरुम किंमत 5.45 लाख रुपये ते 8.77 लाख रुपयांपर्यंत आहे. 

4/6

मारुति सुझुकी जिम्नी

मारुति सुझुकी जिम्नी

एका जीपप्रमाणे दिसणारी ही मारुती सुझुकीची ही कार आता 3 दरवाजाऐंवजी 5 वर्जनसोबत मार्केटमध्ये लाँच झाली आहे. महत्वाचं म्हणजे भारतीय ग्राहकांकरता ही कार विकसित करण्यात आली आहे. मारूतीने इंडियन ऑटो एक्सपो 2020 मध्ये याला शोकेस केलं होतं. या कारला तेव्हा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या कारला कंपनी लवकरच भारतात लाँच करणार आहे. 10 लाखाच्या आसपास या कारची किंमत असणार आहे. 

5/6

मारुति सुजुकी ग्रँड विटारा

मारुति सुजुकी ग्रँड विटारा

भारतात ही मारूती पहिली प्रिमियम SUV होती. मात्र सेल कमी झाल्यामुळे भारतात याचं प्रोडक्शन थांबवण्यात आलं. आता कंपनीने या कारला नव्या लूक आणि फिचर्ससोबत रिलॉन्च केलं आहे. 

6/6

स्विफ्ट फेसलिफ्ट

स्विफ्ट फेसलिफ्ट

भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये मारुती सुझिकी स्विफ्टचा समावेश आहे. गेल्यावर्षी या कारला 1,60,765 ग्राहकांनी खरेदी केलं आहे. या कारची वाढती मागणी पाहता कंपनीने कारचं नवं वर्झन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या इंजिनमध्ये पहिल्याप्रमाणेच 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचं ऑप्शन देण्यात आलं आहे. AMT वेरिएंट्समध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्ट सारखे फिचर्स अपडेट केले आहेत.