पृथ्वीवरुन चंद्रावर जाण्यासाठी सुसट रस्ता; कनेक्टेड सुपर हायवे बांधण्याचा आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रोजक्ट

पृथ्वीवरुन चंद्रावर जाण्यासाठी सुपर हायवे बांधला जाणार आहे. 

| Jul 23, 2024, 19:28 PM IST

Space Superhighway: चीनचे प्रयोग नेहमीच जगाला थक्क करणारे असतात. चीन आता पुन्हा एकदा असाच भन्नाट प्रयोग करत आहे. पृथ्वीवरुन चंद्रावर जाण्यासाठी रस्ता तयार केला जाणार आहे. चीन पृथ्वी आणि चंद्राला कनेक्ट करणारा सुपर हायवे बांधणार आहे. 

1/7

चिनी संशोधकांनी पृथ्वी आणि चंद्र दरम्यान नेटवर्क पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी एक रोडमॅप तयार केला आहे. 

2/7

या सुपर हायवे म्हणजे प्रत्यक्षात सॅटेलाईटचा मार्ग असणार आहे. जपान आणि अमेरिकेच्या स्पेस एजंसी देखील अशा प्रकारचा प्रोजेक्ट राबवणार होते. मात्र, त्याआधीच चीनने बाजी मारली आहे.  

3/7

चीनच्या Chang'e-5 मोहिमेचे मुख्य डिझायनर यांग मेंगफेई यांच्या नेतृत्वाखालील टीम या प्रोजेक्टचा एक भाग आहे. 

4/7

अंतराळवीरांसाठी हा  स्पेस हायवे बांधला जाणार आहे. या स्पेस हायवेमुळे 20 किंवा त्याहून अधिक अंतराळवीरांना एकाच वेळी ऑडिओ तसेच व्हिडिओद्वारे पृथ्वीशी संवाद साधता येणार आहे.

5/7

सिस्लुनर स्पेस म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील प्रदेशात हा Space Superhighway तयार केला जाणार आहे.

6/7

 या प्रोजेक्ट अंतर्गत चंद्रावर 3 ग्राउंड स्टेशनवर 30 उपग्रहांचे संपूर्ण नेटवर्क उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या सुपर हायवेवर  नेव्हिगेशन आणि रिअल-टाइम कम्युनिकेशन करता येणार आहे.  

7/7

चायना अकादमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी (CAST) आणि बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्पेसक्राफ्ट सिस्टम इंजिनिअरिंगच्या संशोधक या प्रोजेक्टवर काम करत आहेत.