Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांना लावलं 'कुंकुमतिलक' अन् उचलला धनुष्यबाण, म्हणाले...

CM Eknath Shinde Ayodhya Visit: उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथील शरयू नदीकाठी महाआरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली, या खास प्रसंगाची माहिती शिंदे यांनी ट्विट करून दिली आहे.

Apr 10, 2023, 00:00 AM IST

CM Eknath Shinde Ayodhya Visit: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Visit) आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) देखील अयोद्धेला पोहोचले. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा होताना दिसत आहे.

1/5

उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथील शरयू नदीकाठी महाआरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली, या खास प्रसंगाची माहिती शिंदे यांनी ट्विट करून दिली आहे.

2/5

रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष आणि रामजन्मभूमी लढ्यातील अग्रणी महंत गोपालदासजी महाराज यांचा सन्मान केला तसेच प्रभू श्रीरामाच्या नीतीने राज्य करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

3/5

धनुष्यबाण हे फक्त शिवसेनेचं पक्षचिन्ह नसून आमच्या अस्मितेचं प्रतीकही आहे त्यामुळे धनुष्यबाण हाती घेऊन त्याला मनोभावे वंदन केलं, असंही ते म्हणाले.

4/5

याप्रसगी महंतांच्या हस्ते हिंदुत्वाचे प्रतीक असलेला कुंकुमतिलक लावण्यात आला. धनुष्यबाण, राम पंचायतन आणि गदेचे विधिवत पूजन करून या तीनही पवित्र वस्तू सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्या.

5/5

अयोध्येतील लक्ष्मण किला येथे पार पडलेल्या दर्शन आणि महंत संकल्प महोत्सवाला उपस्थित राहून जमलेल्या सर्व महंताना मनःपूर्वक अभिवादन केलं. तसेच त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांचे शुभाशीर्वादही घेतलं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.