19 वर्षी राजकारणात, काँग्रेस ते शिंदे गट व्हाया NCP, 6 महिन्यांपूर्वी पत्नीचं निधन अन्...; कोण होते अनिल बाबर?

CM Eknath Shinde Group MLA  Death Due To Pneumonia: मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यातच त्यांना मंगळवारी न्यूमोनियाचं निदान झाल्याने काल दुपारी एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 19 व्या वर्षापासून सक्रीय राजकारणात असलेल्या या आमदाराने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ते शिंदे गट असा राजकीय प्रवास केला आहे. या नेत्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...

| Jan 31, 2024, 09:57 AM IST
1/14

CM Eknath Shinde Group MLA  Anil Babar Death Due To Pneumonia

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार अनिल बाबर यांचं निधान झालं आहे.  

2/14

CM Eknath Shinde Group MLA  Anil Babar Death Due To Pneumonia

मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार बाबर यांची अशी ओळख होती. ते 74 वर्षांचे होते. ते खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.  

3/14

CM Eknath Shinde Group MLA  Anil Babar Death Due To Pneumonia

मागील काही दिवसांपासून अनिल बाबर आजारी होते. न्यूमोनिया झाल्याने काल (30 जानेवारी 2024 रोजी) दुपारी सांगलीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान बाबर यांचं निधान झालं.

4/14

CM Eknath Shinde Group MLA  Anil Babar Death Due To Pneumonia

अनिल बाबर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळख होती. शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतरही अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.  

5/14

CM Eknath Shinde Group MLA  Anil Babar Death Due To Pneumonia

2021 साली शिंदेंनी बंड केलं तेव्हा अनिल बाबर शिंदेंबरोबर अगदी गुवहाटीलाही गेले होते. सांगलीच्या खानापूर मतदारसंघाचे अनिल बाबर प्रतिनिधित्व करत होते.

6/14

CM Eknath Shinde Group MLA  Anil Babar Death Due To Pneumonia

अनिल बाबर यांनी 2019 च्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. 

7/14

CM Eknath Shinde Group MLA  Anil Babar Death Due To Pneumonia

अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते.

8/14

CM Eknath Shinde Group MLA  Anil Babar Death Due To Pneumonia

अनिल बाबर यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिथून शिवसेना असा राजकीय प्रवास केला. एकेकाळी ते शरद पवारांच्या जवळच्या आमदारांपैकी एक होते.

9/14

CM Eknath Shinde Group MLA  Anil Babar Death Due To Pneumonia

कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांमध्ये अनिल बाबर मुख्यमंत्री शिंदेंशी एकनिष्ठ राहिले. ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली, त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं. 

10/14

CM Eknath Shinde Group MLA  Anil Babar Death Due To Pneumonia

अनिल बाबर यांची ही आमदार म्हणून चौथी वेळ होती. 1990, 1999, 2014, 2019 ची आमदारकीची निवडणूक ते जिंकले.

11/14

CM Eknath Shinde Group MLA  Anil Babar Death Due To Pneumonia

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले. टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो.

12/14

CM Eknath Shinde Group MLA  Anil Babar Death Due To Pneumonia

गेल्या वर्षीच अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचं निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर अवघ्या 6 महिन्यानंतर अनिल बाबर यांचंही निधन झालं. वर्षभराच्या आत बाबर कुटुंबातील महत्वाच्या 2 सदस्यांच्या निधनामुळे बाबर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

13/14

CM Eknath Shinde Group MLA  Anil Babar Death Due To Pneumonia

बाबर यांच्या निधनामुळे आज होणारी मंत्रीमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे बाबर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आटपाडीला जाणार आहे.

14/14

CM Eknath Shinde Group MLA  Anil Babar Death Due To Pneumonia

बाबर हे शिंदेंचे निकटवर्तीय मानले जायचे. सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आटपाडीला जाणार असून त्यांच्याबरोबर काही मंत्रीही उपस्थित असतील अशी माहिती समोर आली आहे.