नासाच्या टेलिस्कोपने पाठवले ताऱ्यांनी भरलेल्या महाकाय आकाशगंगेचे नवे फोटो, पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल अवाक्!

नासाच्या जेम्स वेब दुर्बिणीनं पृथ्वीच्या जवळच्या नव्या वर्तुळाकृती आकाशगंगांची विस्मयकारी छायचित्र जारी केली आहेत.

Jan 31, 2024, 08:50 AM IST
1/8

यातील सर्वात जवळची आकाशगंगा 15 दशलक्ष प्रकाश वर्षाच्या अंतरावर तर सर्वात दूरची आकाशगंगा 60 दशलक्ष प्रकाशवर्षांच्या अंतरावर असल्याचं नासाच्या शास्त्राज्ञांचं म्हणणं आहे.  

2/8

जेम्स वेब या नासाच्या दुर्बिणीने 2022 मध्ये अंतराळातील माहिती गोळा करायला सुरुवात केली.

3/8

या दुर्बिणीच्या माध्यमातून नासाचे शास्त्रज्ञ विश्वाच्या निर्मितीच्या सुरुवातीचा काळ नेमका कसा होता याविषयी संशोधन करत आहेत.

4/8

याच अभ्यासादरम्यान दुर्बिणीने आतापर्यंत अवकाशातील अनेक विस्मयकारी छायाचित्र घेतली आहेत.  

5/8

याचाच एक भाग असलेली जवळपास 20 छायाचित्र नासाने काल सार्वजनिक केली. जेम्स वेब ही दुर्बिण अंतराळात 2021 पासून भ्रमण करतेय.

6/8

या भ्रमणादरम्यान विश्वाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी अनेक महत्वाचे धागेदोरे आतापर्यंत शास्त्रज्ञांच्या हाती आले आहेत.

7/8

जेम्स वेब दुर्बिणीच्या आधी १९९० साली अंतराळात पाठवण्यात आलेल्या हबल दुर्बिणीनेही विश्वाच्या निर्मितीच्या संशोधनात मोलाचा वाटा उचलला आहे.

8/8

विशेष म्हणजे जवळपास ३४ वर्ष झाली तर हबलच्या माध्यमातून नवनवीन माहिती समोर येत असतेच. अंतराळाच्या अभ्यासकांसाठी नासाने काल जारी केलेली छायाचित्र नवी पर्वणी ठरतायातय.