मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा साधेपणा! अक्कलकोटच्या अन्नछत्रात झाल्या वाढपी; पंगतीत बसून घेतला महाप्रसाद

Lata Shinde Served Food: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंसंदर्भातील माहिती समोर आली असून अनेकांनी मुख्यमंत्री शिंदेंची पत्नी लता शिंदे यांचं कौतुक केलं आहे. जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती...

| Jul 12, 2023, 09:40 AM IST
1/10

CM Eknath Shinde Wife Lata Shinde Offered Her Service At Akkalkot Temple Kitchen

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या साधेपणासाठी आणि लोकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी ओळखले जातात. काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी मुंबईच्या वाट्यावर असताना साताऱ्यातील भागडवाडीमध्ये एका वृद्ध दाम्पत्याची भेट घेतली होती. या दोघांनाही आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.

2/10

CM Eknath Shinde Wife Lata Shinde Offered Her Service At Akkalkot Temple Kitchen

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईमधील शीव येथे बंद पडेलल्या एका रुग्णवाहिकेतील रुग्णाला तातडीने ठाण्यामधील सिव्हील रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी स्वत: पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळाला. ठाण्यातील अधिकऱ्यांना फोन करुन स्वत: मुख्यमंत्र्यांनी या रुग्णाची काळजी घेण्यास सांगितलं.

3/10

CM Eknath Shinde Wife Lata Shinde Offered Her Service At Akkalkot Temple Kitchen

मुख्यमंत्र्यांप्रमाणे त्यांची पत्नी लता एकनाथ शिंदेही त्यांच्या साध्या रहाणीमानासाठी ओळखल्या जातात. लता शिंदे या फारच क्वचितच माध्यमांसमोर येतात. काही दिवसांपूर्वीच शिंदे दांपत्याने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाची महापुजा केली.

4/10

CM Eknath Shinde Wife Lata Shinde Offered Her Service At Akkalkot Temple Kitchen

विठ्ठलाच्या महापुजेला शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे आणि त्यांची पत्नी तसेच मुख्यमंत्र्यांचा नातूही उपस्थित होता. या संपूर्ण कुटुंबाचे फोटो चांगलाच चर्चेचा विषय ठरले. मात्र आता मिसेस मुख्यमंत्र्यांचे काही खास फोटो व्हायरल होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

5/10

CM Eknath Shinde Wife Lata Shinde Offered Her Service At Akkalkot Temple Kitchen

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये एकनाथ शिंदेंच्या धर्मपत्नी लता या पंगतीमध्ये भोजन वाढताना दिसत आहेत.

6/10

CM Eknath Shinde Wife Lata Shinde Offered Her Service At Akkalkot Temple Kitchen

हे फोटो अक्कलकोटमधील आहेत. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पत्नी सौ. लता शिंदेंनी अक्कलकोटच्या अन्नछत्रात स्वतः वाढपी बनून सेवा केली," असं या फोटोंच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

7/10

CM Eknath Shinde Wife Lata Shinde Offered Her Service At Akkalkot Temple Kitchen

लता शिंदेंचे हे फोटो मंगळवारचे आहेत. लता शिंदे यांचा मंगळवारी म्हणजेच 11 जुलै रोजी वाढदिवस असल्याने त्या स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आल्या होत्या.

8/10

CM Eknath Shinde Wife Lata Shinde Offered Her Service At Akkalkot Temple Kitchen

फोटोंमध्ये लता शिंदे या अन्नछत्रात वाढपी म्हणून सेवा करण्याबरोबरच भाविकांशी संवाद साधतानाही दिसत आहेत.

9/10

CM Eknath Shinde Wife Lata Shinde Offered Her Service At Akkalkot Temple Kitchen

अन्नछत्रामध्ये वाढपी म्हणून सेवा दिल्यानंतर लता शिंदेंनीही या ठिकाणी सामान्य लोकांप्रमाणे रांगेत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

10/10

CM Eknath Shinde Wife Lata Shinde Offered Her Service At Akkalkot Temple Kitchen

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा साधेपणा पाहून स्वामीभक्त सुखावले असून अनेकांनी लता शिंदेंच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे.