मुख्यमंत्री नव्हे, पाहा फोटोग्राफर उद्धव ठाकरेंच्या नजरेतून टीपलेला भारत

Jul 27, 2020, 09:36 AM IST
1/10

मुख्यमंत्री नव्हे, पाहा फोटोग्राफर उद्धव ठाकरेंच्या नजरेतून टीपलेला भारत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युवा नेता म्हणून राजकीय वर्तुळात प्रवेश केला आणि आज वयाच्या ६० व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या याच व्यक्तीनं राज्यातील अतिशय महत्त्वाच्या पदाची धुरा सांभाळली. 

2/10

मुख्यमंत्री नव्हे, पाहा फोटोग्राफर उद्धव ठाकरेंच्या नजरेतून टीपलेला भारत

राजकीय वर्तुळात वावरणारे उद्धव ठाकरे हे कलाप्रेमी. कलेवर त्यांचं विशेष प्रेम. किंबहुना त्यांना स्वत:लाही एक सुरेख कला अवगत आहे. ही कला म्हणजे छायाचित्रणाची. अर्थात फोटोग्राफीची. चला तर मग पाहूया त्यांच्या कलेची साक्ष देणारे काही क्षण.... 

3/10

मुख्यमंत्री नव्हे, पाहा फोटोग्राफर उद्धव ठाकरेंच्या नजरेतून टीपलेला भारत

उद्धव ठाकरे यांच्या या कलेची झलक पाहायला मिळते ती म्हणजे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून. 

4/10

मुख्यमंत्री नव्हे, पाहा फोटोग्राफर उद्धव ठाकरेंच्या नजरेतून टीपलेला भारत

कॅनडा येथील आर्क्टिकच्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये उणे २० अंशांच्या तापमानात, रक्त गोठवणाऱ्या थंडींमध्ये त्यांनी टीपलेलं ध्रुवीय अस्वल म्हणजेच पोलार बिअरचं हे अद्वितीय छायाचित्र. 

5/10

मुख्यमंत्री नव्हे, पाहा फोटोग्राफर उद्धव ठाकरेंच्या नजरेतून टीपलेला भारत

सिक्कीमच्या स्थानिक शाळांमध्ये विद्यार्थ्यी अभ्यासामध्ये मग्न असतानाच त्यांची टीपलेली ही छाया.   

6/10

मुख्यमंत्री नव्हे, पाहा फोटोग्राफर उद्धव ठाकरेंच्या नजरेतून टीपलेला भारत

उद्धव ठाकरे यांनी टीपलेल्या छायाचित्रं बोलकी असण्यासोबतच त्यात अनेक बारकावोही टीपल्याचं पाहायला मिळतं. 

7/10

मुख्यमंत्री नव्हे, पाहा फोटोग्राफर उद्धव ठाकरेंच्या नजरेतून टीपलेला भारत

यंदाच्या वर्षी पंढरपूरच्या वारीचा अनुभव राज्यानं एका वेगळ्या अंदाजा घेतला. खुद्द उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल- रखुमाईची शासकीय महापूजा झाली. पण, अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या कॅमेऱ्यातून टीपलेल्या वारीतील ही छायाचित्र मात्र कायम खास असतील. 

8/10

मुख्यमंत्री नव्हे, पाहा फोटोग्राफर उद्धव ठाकरेंच्या नजरेतून टीपलेला भारत

दिवे घाटामध्ये माऊलींची पालखी येताक्षणी काही वर्षांपूर्वी टीपलेलं हे दृश्य. 

9/10

मुख्यमंत्री नव्हे, पाहा फोटोग्राफर उद्धव ठाकरेंच्या नजरेतून टीपलेला भारत

प्राणीमात्रांची विविध रुपं कॅमेऱ्यात कैद करण्यातही उद्धव ठाकरे यांना कोणी मागे टाकू शकत नाही. गीर अभयारण्यातील त्याचीच ही एक झलक. 

10/10

मुख्यमंत्री नव्हे, पाहा फोटोग्राफर उद्धव ठाकरेंच्या नजरेतून टीपलेला भारत

बांधवगड येथे डरकाळी देणारा वाघ. (सर्व छायाचित्रे सौजन्य- उद्धव ठाकरेय इन्स्टाग्राम)